Home | Business | Gadget | Airtel launching new prepaid plan

Airtel च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळेल जास्त डेटा, इतक्या दिवसांची आहे व्हॅलिडीटी...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 17, 2018, 01:09 AM IST

डाउनलोड स्पीडमध्ये जियो पुढे

 • Airtel launching new prepaid plan

  गॅजेट डेस्क- मोबाइल ऑपरेटर कंपन्यामध्ये स्वस्त प्रीपेड प्लॅन देण्याची रेस चालुच आहे. देशातील मोठी मोबाइल ऑपरेटर कंपनी एअरटेलने आता आपल्या 199 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनला जास्त अपग्रेड करून पुन्हा लाँच केले आहे. यात एअरटेलच्या प्रीपेड ग्राहकांना 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये आधीपेक्षा जास्त डाटा मिळणार आहे. ग्राहकांना या प्लॅनमध्ये 1.5 जीबी 2G/3G/4G डेटा रोज मिळणार आहे.

  - दूरसंचार कंपन्या ग्राहकांना आपर्शित करण्यासाठी नवीन प्लॅन आणत आहे. यात रिलायंस जिओला टक्कर देण्यासाठी वोडाफोनने 199 रुपये आणि 399 रुपये प्रीपेड प्लॅन लाँच केले आहेत.

  नवीन प्लॅन प्रत्येक सर्कलमध्ये उपलब्ध
  भारती एअरटेलने आपल्या प्रत्येक सर्कलमधल्या ग्राहकांसाठी 199 वाला प्लॅन उपलब्ध केला आहे. हा प्लॅन 28 दिवसांसाठी आहे. या प्लॅनमध्ये अनलिमीटेड कॉल आणि रोज 100 एमएमएस मिळतील.


  डाउनलोड स्पीडमध्ये जियो पुढे
  देशभरात 4जी डेटा डाउनलोड करण्याच्या बाबतीत रिलायंस जियो सगळ्यात पुढे आहे. कंपनीच्या नेटवर्कवर डाउनलोड स्पीड नोव्हेंबरमध्ये 25.6 एमबीपीएस रेकॉर्ड केली आहे. ट्रायच्या मते जिओची स्पीड इतर सगल्या ऑपरेटरपेक्षा जास्त आहे.

Trending