आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनिमम मंथली प्लॅनमुळे एअरटेलचे 7 कोटी ग्राहक कमी होण्याची शक्यता, तरिही कंपनी फायद्यातच...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- भारती एअरटेलचे 5-7 कोटी ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे. याचे कारण कंपनीचे नवीन नियम आहेत, कंपनीने 1 डिसेंबरपासून मिनिमम मंथली प्लॅन सुरू केले आहे. या प्लॅनच्या अंतर्गत ग्राहकांना आपली इनकमींग सेवा चालु ठेवण्यासाठी कमीत-कमी 35 चा रिचार्ज करावा लागेल. पण एका वेबसाइटने दावा केला आहे की, एअरटेलच्या याच प्लॅनमुळे कंपनीचे 5-7 कोटी ग्राहक कमी होण्याची शक्यता आहे.

 

ग्राहक गेल्याने फरक नाही पडत
एअरटेल कंपनीकडून सांगण्यात आले की, मिनिमम मंथली प्लॅनमुळे जर ग्राहक कमी झाले तर यामुळे कंपनीला काहीही नुकसान होणार नाहीये. जेपण ग्राहक कंपनी सोडत आहेत त्यांच्याजवळ लाइफटाइम व्हॅलिडीटी असलेला प्लॅन होता, आणि ते फक्त इनकमींग सर्विसचा वापर करायचे त्यामुळे त्यांच्या जाण्याने काहिही फरक पडत नाही.

 

यामुळे कंपनीलाच होईल फायदा
एअरटेलचे म्हणने आहे की, जे ग्राहक एअरटेलच्या नेटवर्कचा फुकट फायदा घेत होते त्यांच्या जाण्याने नेटवर्क फ्री होईल, आणि इतर ग्राहकांना फायदा मिळेल. या ग्राहकांच्या जाण्याने कंपनीचे अॅवरेज रेवेन्यू पर यूझर(ARPU) देखील वाढेल.

 

एअररटेने सुरू केले नवीन 3 प्लॅन

एअरटेलने आपल्या मिनिमम मंथली प्लॅनच्या अंतर्गत तीन रिचार्ज प्लॅन सुरू केले होते. यांत सगळ्यात स्वस्त 35 रूपयाचा आहे, त्यात 26 रूपयाचा टॉकटाइम आणि 100 एमबी डेटा मिळतो. त्यानंतर एक 65 रूपयांचा प्लॅन आहे त्यात 55 रूपये टॉकटाइम आणि 200 एमबी डेटा मिळतो. सगळ्या महाग प्लॅन 95 रूपयांचा आहे, त्यात 95 रूपयांचा फूल टॉकटाइम आणि 500 एमबी डेटा मिळतो.  या तिन्ही प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवस आहे.
 

बातम्या आणखी आहेत...