आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरकाॅमच्या मालमत्तेसाठी एअरटेलची सशर्त सर्वाधिक अपफ्रंट कॅशची ऑफर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भारती एअरटेलने अनिल अंबानींची दूरसंचार कंपनी रिलायन्स कम्युनिशेन्सच्या मालमत्तेसाठी सर्वाधिक अपफ्रंट कॅश दिली आहे. ही कंपनी दिवाळखाेरीतून जात आहे. या प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या लाेकांनी सांगितले की, सुनील मित्तल यांची कंपनी भारती एअरटेलने आरकाॅमच्या मालमत्तेसाठी ९५०० काेटी रुपये अपफ्रंट कॅश दिली आहे. या मालमत्तेत आरकाॅमचे स्पेक्ट्रम टाॅवर, टाॅवर फायबर, डेटा सेंटर आणि रियल इस्टेट समाविष्ट आहे. रिलायन्स जिओ गेल्या वर्षी आरकाॅमच्या स्पेक्ट्रमसह सर्व मालमत्ता खरेदी करण्यास तयार झाली हाेती. असे असले तरी तेव्हा स्पेक्ट्रम आणि रिअल इस्टेटचा लिलाव झाला नव्हता. एका सूत्रानुसार, रिलायन्स जिओ इन्फाेकाॅमने ३६०० काेटी रुपये अपफ्रंट कॅश पेमेंट केले आहे. मात्र, इन्फाेकाॅमने ३६०० काेटी रुपये अपफ्रंट कॅश पेमेंट केले आहे.

स्पेक्ट्रमशिवाय रिलायन्स जिओ गेल्या वर्षी ४३,००० टाॅवर आणि १,७८,००० रुट किमी ऑप्टिक फायबरही खरेदी करण्यास तयार हाेती. मात्र, दूरसंचार विभागाकडून मंजुरी न मिळाल्यामुळे हा करार हाेऊ शकला नाही. भारती एअरटेलच्या एका प्रवक्त्याने आधीच मीडियाला सांगितले हाेते की, स्पेक्ट्रमसाठी कंपनीने अट घातली आहे. स्पेक्ट्रम आरकाॅमची सर्वात माेठी मालमत्ता आहे. प्रवक्त्याने १४ नाेव्हेंबरला सांगितले की, कंडिशनल बिड'मध्ये आमचा पक्ष असा की, स्पेक्ट्रमसाठी सरकारला उशिराने पेमेंट करण्याचा अधिकार आम्हाला मिळावा.

अपफ्रंट कॅश म्हणजे ॽ

अपफ्रंट कॅश म्हणून जी रक्कम दिली जाते, त्याचे मूल्यांकन क्रेडिटर्स बाेलीच्या विजेत्या कंपनीवर निर्णय घेताना करते. मात्र, अपफ्रंट कॅशसाेबत भारती एअरटेलने काही अटीही घातल्या आहेत. एका सूत्राने सांगितले की, या अटींमुळे एअरटेलच्या बाेलीची व्यावहारिकता कमी हाेते. मात्र, त्यांनी या संदर्भात जास्त माहिती दिली नाही.
 

बातम्या आणखी आहेत...