आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Airtel चा बंपर धमाका: Jio ला टक्कर देण्यासाठी आणला नवीन प्लॅन; 105GB डेटासोबत मिळेल Jio पेक्षा जास्त व्हॅलिडिटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - सध्या Jio ने टेलीकॉम मार्केटमध्ये धुमाकूऴ घातला आहे. आता Jio ला टक्कर देण्यासाठी एयरटेलने देखील विविध नवीन प्लॅन सादर केले आहेत. यामध्ये 4G डेटा सोबत अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देण्यात येत आहे. एयरटेलने 549 आणि 799 प्लॅनला वगळून 199 ते 509 रूपयांचा प्लॅन आणला आहे. 500 रुपयांच्या सेगमेंटमध्ये कंपनीने आता 419 रुपयांचा नवीन प्रीपेड प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन सर्व ग्राहकांसाठी आहे. यामध्ये अनलिमिटेड SMS सोबत 1.4 जीबी 4 जी डेटा युझर्सना देण्यात येईल. याची वैधता 75 दिवसांची असेल म्हणजे संपूर्ण कालावधीत 105GB डेटा वापरता येईल.

 

Jio ला टक्कर देण्यासाठी सादर केला प्लॅन
> जिओच्या 349 रुपयाच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलने हा नवीन प्लॅन सादर केला आहे. Jio च्या प्लॅनमध्ये देखील 105 जीबी डेटा मिळतो. पण एअरटेलच्या तुलनेत जिओच्या प्लॅन मध्ये 100 एमबी डेली लिमीट आहे. याचा अर्थ आपण दररोज 1.5 जीबी डेटा वापरु शकता. अमर्यादित एसएमएस आणि अमर्यादित रोमिंग सुविधा यामध्ये सुद्धा उपलब्ध आहे. असे असले तरी एअरटेल प्लॅनची वैधता 75 दिवस आहे आणि जिओच्या प्लॅनची वैधता 70 दिवसांची आहे. म्हणचे Airtelच्या प्लॅनमध्ये Jioपेक्षा जास्त वैधता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...