आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Nanda Selected As Nayab Tehsildar Through UP PCS Exam Answering These Questions

भारतात जमीनीमध्ये ड्रिल करून चेंडू टाकल्यास तो पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूने अमेरिकेत निघेल का? Interview मध्ये अशा प्रश्नांची उत्तर देऊन बनले अधिकारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये राहणारे 26 वर्षीय ऐश्वर्य नंदा यांनी पीसीएस-2016 मध्ये यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांना नायब तहसीलदाराचे पद मिळाले आहे. 2014 मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅजुएशन केल्यानंतर त्यांनी पीसीएसची तयारी केली. लोक कोचिंग क्लास जॉइन करतात परंतु, ऐश्वर्य यांनी सेल्फ स्टडी करून ही मजल मारली. इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी त्यांनी मॉक इंटरव्ह्यूची मदत घेतली. 5 जणांच्या टीमने 40 मिनिटे त्यांना विविध प्रश्न विचारले. आमच्याशी संवाद साधताना नंदा यांनी त्यापैकी प्रश्नोत्तरे सांगितली आहेत.


Q. सिव्हिल इंजीनिअरिंग केली असेल तर मग सांगा, जर आपल्याकडे दोन-तीन प्लॉट आहेत तर घर बनवण्यासाठी कोणत्या जागेची निवड कराल?
A. मी तिन्ही जागांच्या मातीचे प्रोफाइल (सॉइल टेस्ट) करून पाहणार. कुठे कठोर जमीन आहे आणि कुठे डेफ्थ आहे. डेफ्थ असलेली जागा सोडून कठोर जमीनीवर बांधकाम करेन.


Q. भारताच्या 5 सर्वात मोठ्या समस्य कोणत्या त्या घटत्या क्रमाने सांगा?
A. बेरोजगारी, दारिद्र्य, निरक्षरता, लोकसंख्या आणि संरक्षण.


Q. मग आपल्याला असे वाटते की आरोग्य या 5 समस्यांमध्ये नाही? 
A. मुळीच नाही सर, मी ज्या 5 समस्या मांडल्या त्यामध्ये संरक्षण सुद्धा आहे. आणि संरक्षण आरोग्याच्या बाबतीतही लागू होते. अर्थातच, हेल्थ सिक्यॉरिटी, फूड सिक्यॉरिटी आणि किती न्यूट्रीशन घ्यावे इत्यादी...


Q. नोटबंदीने काय फायदा झाला?
A. फायदा या अर्थाने झाला की कुठे तरी सरकार काम करत आहे. परंतु, नोटबंदीची अंमलबजावणी सुनियोजित नव्हती. काही नुकसान आवश्य पाहायले मिळाले आहेत. या सर्वच गोष्टींमधून एक हेतू आवश्य कळाला की सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे.


Q. आज तारीख कोणती आहे?
A. 4 जानेवारी.

Q. मला आजच सेमिनार अटेंड करण्यासाठी अमेरिकेत जायचे आहे आणि आपल्याला मी तिकीट बुक करण्याचे काम दिले आहे; परंतु, संध्याकाळचे 5.30 वाजले असतानाही तुम्ही मला आज तेथे कसे पाठवणार? 
A. सर, आप आजच अमेरिकेला पोहोचाल. मग प्रश्नच कशाचा? यानंतर ऐश्वर्य म्हणाले, सर इंटरनॅशनल टायमिंग मागे आहे. आता न्यूयॉर्कच्या हिशोबाने सकाळचे 8.30 वाजले आहेत. अर्थात फ्लाइटने आजच सेमिनार अटेंड करण्यासाठी जाऊ शकाल.


Q. पृथ्वी गोलाच्या एका बाजूला आपण भारतात आहोत तर दुसऱ्या बाजूला कोणता देश असेल?
A. अमेरिका.


Q. भारतात जमीनीमध्ये ड्रिल करता-करता एक चेंडू टाकल्यास तो पृथ्वी गोलाच्या दुसऱ्या बाजूने अर्थात अमेरिकेत निघणे शक्य आहे का?
A. सर पृथ्वीचा आतील भाग खूप उष्ण असतो. आपण छिद्र पाडून त्यामध्ये चेंडू टाकल्यास तो उष्णतेपर्यंत पोहोचून नष्ट होईल. (एवढे ऐकताच पॅनलमध्ये हशा फुटला. एकाने म्हटले, इतके सायंटिफिक होण्याची गरज नाही. हायपोथेटिकली उत्तर द्या)


Q. समजा जर का चेंडू नष्ट झाला नाही. आपण चांगले मटेरिअल वापरले असेल, मग?
A. सर मी याचे उत्तर देऊ शकणार नाही. (इंटरव्ह्यू नंतर ऐश्वर्यने याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हा प्रश्न भौतिकशास्त्राचा असल्याचे कळाले. पृथ्वीच्या मध्यभागी मॅग्नेटिक फील्ड असतो. त्यामुळे, चेंडू आर-पार जाणे अशक्य आहे.)

बातम्या आणखी आहेत...