Home | Party | Aishwarya rai Aaradhya To Jaya Abhishek bachchan enjoy Navya Naveli Nandas birthday party

बहीण आराध्यासोबत नव्या नवेलीने सेलिब्रेट केला 21 वा बर्थडे, मामी ऐश्वर्या-आजी जया यांनी एन्जॉय केली पार्टी, नातीच्या बर्थडे पार्टीत गैरहजर होते अमिताभ बच्चन : Video

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:59 PM IST

नव्याच्या पार्टीचे बॉलिवूडच्या 2 स्टारकिड्सना आमंत्रण मिळाले होते...

  • मुंबईः अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा 21 वर्षांची झाली आहे. नव्याने तिचा वाढदिवस बच्चन फॅमिलीसोबत साजरा केला. या सेलिब्रेशनचे इनसाइड फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. व्हिडिओत नव्या तिची मामेबहीण आराध्या बच्चनसोबत केक कापताना दिसतेय. नव्यासोबत तिची आई श्वेता नंदा, वडील निखिल नंदा, मामा अभिषेक बच्चन, मामी ऐश्वर्या राय आणि आजी जया बच्चन पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. पण या सेलिब्रेशनमध्ये नव्याचे आजोबा अमिताभ बच्चन उपस्थित नव्हते. बॉलिवूडमधून नव्याने तिच्या दोन खास मैत्रिणी खुशी कपूर (श्रीदेवीची मुलगी) आणि शनाया कपूर (संजय कपूरची मुलगी) यांना आमंत्रित केले होते.


    शाहरुखच्या मुलासोबत आहे नव्याची मैत्री...
    - नव्या नवेली नंदा ही अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता हिची मुलगी आहे. नव्या सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. इतकेच नाही तर ती फ्रेंड्ससोबत कायम पार्टी एन्जॉय करताना दिसत असते. नव्याचे शाहरुखचा मुलगा आर्यनसोबत चांगले ट्युनिंग आहे.

    नव्याला आहे पियानो वाजवण्याची आवड...
    - नव्याचे वडील निखिल नंदा हे नंदा एस्कॉर्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. नव्याला पियानो वाजवणे पसंत आहे. काही दिवसांपूर्वी नव्याचा एक फोटो समोर आला होता, त्यात ती तिचे आजोबा अमिताभ बच्चन यांच्यासोबत पियानो वाजवताना दिसली होती.

Trending