आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये पडता-पडता वाचली ऐश्वर्या, नणंदने वेळेवर सावरले, नणंद-भावजयीच्या नात्यातील तणाव आता निवळलाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : रणवीर सिंह-दीपिका पदुकोण यांचे रिसेप्शन शनिवारी (1 डिसेंबर) हॉटेल ग्रँड ह्यातमध्ये झाले. ही पार्टी बॉलिवूड कलाकारांसाठी होती. बच्चन कुटुंबही या रिसेप्शनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी चालता-चालता ऐश्वर्या अडखळली, तेवढ्यात नणंद श्वेताने तिला सांभाळून घेतले. या प्रसंगाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेहमी चर्चा असते की, या नणंद-भावजयीचे एकमेकींशी पटत नाही. पण दीपवीरच्या रिसेप्शनमध्ये या दोघींची खूप छान बॉण्डिंग असल्याचे दिसले. एवढेच नाही तर फोटोसेशननंतर दोघीजणी हसत हसत गप्पा मारत होत्या. दोघींच्या अशा वागण्याने आता त्यांच्या नात्यात कुठलाही ताण नाही हे खरे ठरले आहे. फोटोसेशनच्यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की, कॅमेरा फेस करावा लागू नये म्हणून जया बच्चन स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. 

 

तीन लाखांपेक्षाही जास्त महाग होता ऐश्वर्याचा लहेंगा..
ऐश्वर्याने घातलेला पांढऱ्या रंगाचा लहेंगा तिला शोभून दिसत होता. या लहेंग्यावर तिने एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाऊज घातले होते आणि नेटची ओढणी घेतली होती. ऐश्वर्याने लाईट मेकअप केलेला होता आणि त्यावर पीच कलरची लिपस्टिक लावली होती. तिने डायमंड नेकलेस आणि रिंग घातली होती. ऐश्वर्याचा हा लहेंगा Falguni Shane Peacock India यांच्या कलेक्शनमधील आहे. या लहेंग्याला ऐश्वर्याने आपल्याला हवे त्यानुसार बनवून घेतले होते. या लहेंग्याची किंमत 3 लाख 33 हजार रुपये इतकी आहे.  

बातम्या आणखी आहेत...