Home | Gossip | Aishwarya rai And Amir khan worked together in an ad

डायरेक्टर ऐश्वर्या रायला म्हणाला- 'रूममधील 5 लोकांना सिड्यूस कर', पाच लोकांमध्ये होता आमिर खानचा समावेश

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 06:18 PM IST

शुटिंग दरम्यान Awkward फिल करत होती ऐश्वर्या, आमिरला सिड्यूस करण्यासाठी ऐश्वर्याला घ्यावे लागले 21 रिटेक

 • Aishwarya rai And Amir khan worked together in an ad

  मुंबई - ऐश्वर्या राय बच्चनने साऊथ चित्रपटांमधून आपल्या करिअरला सुरूवात केली. बॉलिवुडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिने अनेक हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप सोडली. दरम्यान तिला एका चॅट शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. या शोमध्ये तिने एका जाहीरातीच्या शुटींगचा प्रसंग सांगितला. ही जाहिरात डायरेक्टर प्रल्हाद कक्कडची होती. शोमध्ये तिने सांगितले की, डायरेक्टरने तिला पाच लोकांना सिड्यूस करण्यास सांगितले होते. त्या पाच लोकांमध्ये आमिर खानचा देखील समावेश होता. या शुटींग दरम्यान ती खूप घाबरली होती.

  जाहीरात शुट करण्यासाठी ऐश्वर्याला घ्यावे लागले 21 रिटेक

  चॅट शो दरम्यान ऐश्वर्याची ती जाहीरात दाखवण्यात आली. यामध्ये ती लाल कलरची लिप्सटिक आणि पांढऱ्या शर्टमध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. ऐश्वर्याने सांगितले की, या जाहीरातीच्या शुटींग दरम्यान ती खूप नर्वस झाली होती. तिला डायरेक्टर जसे सांगत होता तसे घडत नव्हते. ऐश्वर्याला अॅक्टींग करण्यासाठी आमिर खानने बरीच मदत केली. अथक प्रयत्नानंतर जाहीरात शुट करण्यात आली. या जाहिरातीला शुट करण्यासाठी तिला 21 रिटेक घ्यावे लागले.

  या चित्रपटातून केले बॉलिवुडमध्ये पदार्पण
  ऐश्वर्या राय बच्चनने इरूवर या दाक्षिणात्य चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली. त्यानंतर ती हिंदी सिनेमाकडे वळाली. 'और प्यार हो गया' या चित्रपटातून तिने बॉलीवुडमध्ये पदार्पण केले. यामध्ये तिच्यासोबत बॉबी देओल लीड रोलमध्ये होता. यानंतर ऐश्वर्याला संजय लीला भंसाळीचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट मिळाला. या चित्रपटात ती अजय देवगन आणि सलमान खान सोबत झळकली होती. या चित्रपटाने तिला नाव आणि प्रसिद्धी दिली.


Trending