आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी आराध्याचा हात धरून चित्रपट पाहायला पोहोचली ऐश्वर्या राय, सोबत अभिषेक बच्चनदेखील दिसला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्यासोबत वीकेंड एन्जॉय करताना दिसली. मुंबईच्या जुहूमध्ये तिघांना एकत्र स्पॉट केले गेले. तिघांनी एकत्र चित्रपट पहिला आणि लंच केले. फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, नेहमीप्रमाणे ऐश्वर्या मुलगी आराध्याची काळजी घेताना दिसत आहे आणि दोघी सोबत चालत आहेत. तसेच अभिषेक त्यांच्या मागे आहे. ऐश्वर्याने पिंक टॉप घातला होता. यासोबत तिने ब्लॅक जीन्स कॅरी केली होती. तसेच अभिषेक स्टायलिश ट्रॅक सूटमध्ये दिसला. आराध्याबद्दल बोलायचे तर ती स्काय ब्लू अटायरमध्ये खूप क्यूट दिसत होती. ऐश्वर्या एखाद्या इव्हेंटमध्ये जावो किंवा पार्टीमध्ये ती नेहमी आराध्याला आपल्या सोबत नेते.

 

ऐश्वर्या नेहमी आराध्याचा हात धरून चालताना दिसते. त्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मात्र ऐश्वर्या रायचे म्हणणे आहे की, 'मी माझा पूर्ण दिवस आराध्यासोबत घालवते आणि माझ्याकडे केवळ एक नॅनी आहे, तेही गरजेनुसार. मी कमेंट वाचते, लोक असे बोलतात जसे काही मदतीसाठी पूर्ण सेना हवी असते.'