आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan 76th Birthday: Aishwarya Rai Bachchan Sister In Law Shrima Rai Wishes Big B In Special Way

बिग बींचा 76th बर्थडे: ऐश्वर्या रायच्या वहिनीने हटके अंदाजात केले विश, इमोशनल फोटो पोस्ट करुन लिहिले, 'हा क्षण माझ्या डोहाळे जेवणातील आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: बॉलिवूडचे महानायत अमिताभ बच्चन 76 वर्षांचे झाले आहे. या निमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. ऐश्वर्या रायची वहिनी श्रीमा राय हिनेही अमिताभ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रीमाने इंस्टाग्रामवर तिच्या डोहाळे जेवणातील एक फोटो पोस्ट केला. यात अमिताभ तिला आशीर्वाद देताना दिसत आहेत. पोस्टमध्ये श्रीमाने लिहिले, "अमिताभ बच्चन अतिशय स्वीट आहेत. ते एक महान अभिनेते आहेत. ते अतिशय नम्र आणि लार्जर दॅन लाइफ आहेत. मी त्यांच्या माणुसकीला सलाम करते. हा खास क्षण माझ्या डोहाळे जेवणातील आहे. हॅपी बर्थडे अमिताभ जी"

 

सून ऐश्वर्याने हटके अंदाजात केले बर्थडे विश...  
- ऐश्वर्या रायने अमिताभ बच्चन यांना हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने अमिताभ यांचा आराध्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. फोटोला तिने कॅप्शन दिले, MAY THE LIGHT KEEP SHINING, GOD BLESS. HAPPY BIRTHDAY PA”। 
- आराध्याचा फोटो पोस्ट करुन ऐश्वर्याने लिहिले, "HAPPY 76th BIRTHDAY DADAJI" 

 

एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही श्रीमा... 
- ऐश्वर्याचा थोरला भाऊ आदित्य राय हा मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनिअर आहे. आदित्यचे लग्न मॉडेल असलेल्या श्रीमासोबत झाले आहे. श्रीमा 2009 साली मिसेस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत फर्स्ट रनरअप ठरली होती. सौंदर्यात श्रीमा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मात देते.
- श्रीमा मुळची मंगलोरची आहे. आता तिचे कुटुंब यूएसला शिफ्ट झाले आहे. श्रीमा एक फॅशन ब्लॉगर असून हाऊसवाइफ आहे. सध्या ती मॉडेलिंगपासून दूर आपल्या दोन मुलांच्या संगोपनात बिझी आहे.
- ऐश्वर्या आणि श्रीमा यांच्यातील एक साम्य असलेली गोष्ट म्हणजे दोघीही मॉडेलिंग फिल्डमधून आहे. दोघीही जणी स्ट्राँग बाँडिंग शेअर करतात. 
- एका मुलाखतीत स्वतः श्रीमा म्हणाली होती, "मी कधीच ऐश्वर्याला सुपरस्टार म्हणून बघितले नाही. ती पहिले माझी नणंद आहे. ऐश्वर्या आणि श्रीमा मॉडेलिंग, रॅम्पचे अनुभव आणि टिप्स एकमेकींसोबत शेअर करतात." 
- श्रीमाने सांगितल्यानुसार, 'ऐश्वर्या रॅम्प वॉकमध्ये प्रोफेशनल आहे. आणि ती एक्सप्रेशन्सविषयी माझ्याशी टिप्स शेअर करत असते. तिने मला सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हजे, सर्वकाही विसरुन प्रत्येक क्षण एन्जॉय करायला हवा."

बातम्या आणखी आहेत...