आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan On Cannes Red Carpet. She Wore Golden Green From Jean Louis Sabaji Couture

कान्स 2019/फिश कट गोल्डन गाउनमध्ये आली ऐश्वर्या, कान्स महोत्सवातात गोल्डन कानांनी वेधले सर्वांचे लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- 72 व्या कान्स महोत्सवासात ऐश्वर्या राय बच्चनने आपली हजेरी लावली. या सोहळ्यातील सर्वांचे आकर्षण असणाऱ्या रेड कार्पेटवर ऐश्वर्याने आपल्या स्टायलिश आणि आकर्षक अदांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ती पिवळ्या-हिरव्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये दिसली. तिने आपला लुक खूप साधा अॅलीगंट ठेवला होता. ऐशने जीन लुईस सबाजी कोचरचा फिश कट गाऊन परिधान केला होता. पण तिच्या आउटफिटपेक्षा जास्त लोकांचे लक्ष तिच्या कानावर होते, कारण ऐशने आपल्या कानाला गोल्डन कलरचा टचअप दिला होता.


ब्रॉन्झ मेकअपने दिला बोल्ड लुक
ऐश्वर्याने गोल्डन नेल पॉलिश लावली होती. बेडकाची डिझाइन असलेली आंगठी आणि कानावर पेंट, तसेच छोटेछोटे डायमंड घातले होते. ऐश्वर्याचा हा मेकअप आतापर्यंतच्या सर्व कान्स महोत्सवातील अतिशय वेगळा आहे. त्यासोबतच ऐश्वर्याने ब्रॉन्झ लुकने ग्लिटर आयशॅडो आणि ब्लॅक लायनरने आपला आय मेकअप बोल्ड केला होता. तिचे आयब्रो आणि मस्करा खूप परफेक्ट दिसत होते. आपल्या होठांवर ग्लोसी लिपस्टीक लावली होती. हेयरस्टाइलविषयी सांगायचे झाले तर, केसांना साइड पार्टींगला सरळ करून स्लीक लूक देण्यात आला होता.


आराध्याने केला आईसारखाच लुक 
ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्या बच्चनसुद्धा या महोत्सवासाठी उपस्थित होती. 7 वर्षाच्या आराध्या आपल्या आईला मॅच करण्यासाठी पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. तिच्या ड्रेसमध्ये एक मोठे पिवळे फूल लावण्यात आले होते. यादरम्यान दोघींनीही डांस केला.

बातम्या आणखी आहेत...