आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एखाद्या हीरोइनपेक्षा कमी नाही ऐश्वर्याची वहिणी श्रीमा, ठरली होती मिसेस इंडिया रनरअप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन कायम तिच्या कुटुंबासोबत क्वॉलिटी वेळ घालवताना दिसत असते. अलीकडेच ऐश्वर्या तिची आई वृंदा राय आणि मुलगी आराध्यासोबत एका अवॉर्ड फंक्शनसाठी अमेरिकेला गेली होती. ऐश्वर्याच्या सासरच्या मंडळींना सगळेच ओळखतात. पण तिच्या माहेराविषयी फारसे लोकांना ठाऊक नसावे. उदाहरणार्थ ऐश्वर्याचे भाऊ-वहिणी यांच्याविषयी फारशी माहिती कधी समोर येत नाही. ऐश्वर्याचा थोरला भाऊ आदित्य राय हा मर्चंट नेव्हीमध्ये इंजिनिअर आहे. आदित्यचे लग्न मॉडेल असलेल्या श्रीमासोबत झाले आहे. श्रीमा 2009 साली मिसेस इंडिया या सौंदर्य स्पर्धेत फर्स्ट रनरअप ठरली होती. सौंदर्यात श्रीमा बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मात देते. 


नणंद-वहिणी दोघीही आहेत मॉडेलिंग फिल्डमधून...
ऐश्वर्या आणि श्रीमा यांच्यातील एक साम्य असलेली गोष्ट म्हणजे दोघीही मॉडेलिंग फिल्डमधून आहे. दोघीही जणी स्ट्राँग बाँडिंग शेअर करतात. एका मुलाखतीत स्वतः श्रीमा म्हणाली होती, "मी कधीच ऐश्वर्याला सुपरस्टार म्हणून बघितले नाही. ती पहिले माझी नणंद आहे. ऐश्वर्या आणि श्रीमा मॉडेलिंग, रॅम्पचे अनुभव आणि टिप्स एकमेकींसोबत शेअर करतात." श्रीमाने सांगितल्यानुसार, 'ऐश्वर्या रॅम्प वॉकमध्ये प्रोफेशनल आहे. आणि ती एक्सप्रेशन्सविषयी माझ्याशी टिप्स शेअर करत असते. तिने मला सांगितलेली महत्त्वाची गोष्ट म्हजे, सर्वकाही विसरुन प्रत्येक क्षण एन्जॉय करायला हवा." 


श्रीमा मुळची मंगलोरची आहे. आता तिचे कुटुंब यूएसला शिफ्ट झाले आहे. श्रीमा एक फॅशन ब्लॉगर असून हाऊसवाइफ आहे. सध्या ती मॉडेलिंगपासून दूर आपल्या दोन मुलांच्या संगोपनात बिझी आहे.  

बातम्या आणखी आहेत...