आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याने कँसरग्रस्त मुलांसोबत सेलिब्रेट केला क्रिसमस, मुलांची विचारपुस केली आणि त्यांच्या परफॉर्मेंसची स्तुतीही केली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिनेत्री ऐश्वर्या राय नुकतीच एका कँसर हॉस्पिटलच्या इव्हेंटमध्ये पोहोचली. येथे ती गेस्ट म्हणून आली होती, तिने कँसरग्रस्त मुलांसोबत वेळ घालवला. यादरम्यान मुलांना भेटून ऐश्वर्या भावूक झाली. मुलांची विचारपुस केल्यानंतर ऐश्वर्याने त्यांच्या परफॉर्मेंसची स्तुतीही केली. ऐश्वर्या म्हणाली - तुम्हा सर्वांमध्ये धैर्य, हिंमत आणि आशा आहे यासोबतच सुपरहीरोची ताकदही आहे. तुम्हा सर्वांवर देवाचा आशिर्वाद आहे. यासोबतच तुम्हा सर्वांच्या दिवस रात्र संपर्कात राहणा-या लोकांचे खुप खुप आभार.


ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ती अभिषेक बच्चनसोबत 'गुलाब जामुन' चित्रपटात दिसणार आहे. यापुर्वी ऐश्वर्या अभिषेकने 8 वर्षापुर्वी 2010 मध्ये 'रावन' चित्रपट केला होता. पण हा चित्रपट वाईट पध्दतीने फ्लॉप झाला होता. ऐश्वर्या शेवटच्या वेळी अनिल कपूरसोबत 'फन्ने खां' चित्रपटात दिसली होती. पण हा चित्रपटही बॉक्सऑफिसवर कमाल करु शकला नव्हता. 
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या रायचे कँसरग्रस्त मुलांसोबतचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...