आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aishwarya Rai First Time Open Up On Her Marriage With Abhishek Bachchan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐश्वर्या राय लग्नाविषयी पहिल्यांदा खुलून बोलली, म्हणाली- अभिषेकने प्रपोज केल्यानंतर तिला फिल्मच्या सेटवरही नववधू असल्याची जाणीव व्हायची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या लग्नाला 12 वर्षे झाले आहे. ऐश्वर्याला आपल्या लग्नाविषयी एक-एक क्षण आठवणीत आहे. नुकत्याच फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत पहिल्यांदा ऐश्वर्याने आपल्या लग्नाविषयी एक मजेदार गोष्ट शेअर केली. यासोबतच तिला अभिषेकने कसे प्रपोज केले होते याविषयीही तिने सांगितले. 


न्यूयॉर्कच्या हॉटेलमध्ये केले होते प्रपोज 
- मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सांगितले - 'गुरु' चित्रपट रिलीज होण्यापुर्वी न्यूयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये अभिषेकने मला प्रपोज केले होते. अभीने गुडघ्यावर बसून मला प्रपोज केले होते. त्यावेळी वाटले की, हा हॉलिवूड चित्रपटाचा सीन आहे. 
- ऐश्वर्याने सांगितले- 'अभिषेकने प्रपोज करताच मी हो म्हणाले. मी खुप एक्सायटेड होते. नंतर मी 'जोधा-अकबर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले. जेव्हा सेटवर 'ख्वाजा मेरे ख्वाजा...' गाण्याची शूटिंग होत होती, तेव्हा मला नववधू असल्याची जाणिव होत होती. त्यावेळी मला वाटत होते की, ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन सर्व काही खरोखर होत आहे. माझ्यासोबत काय घडतेय आणि का घडतेय हेच मला कळत नव्हते. माझे वागणे विचित्र झाले होते.'

 

ऋतिक रोशनच्या रिअॅक्शनविषयी बोलली ऐश्वर्या 
एका प्रश्नाचे उत्तर देताना ऐश्वर्याने सांगितले - 'माझ्या विचित्र वागण्यामुळे आशुतोष गोवारिकरने मला विचारले होते की, एंगेजमेंट केली आहे का, तर मी म्हणाले होते की, हो मी एंगेज झाले आहे. हे जेव्हा ऋतिकला कळाले तेव्हा तो खुप एक्सायटेड झाला आहे मला थम्प-अप खेले. हे पाहून मला खुप आनंद झाला होता.'

 

एप्रिल 2007 मध्ये झाले होते लग्न 
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने 20 एप्रिल 2007 मध्ये लग्न केले. दोघांना 6 वर्षांची एक मुलगी आहे. तिचे नाव आराध्या आहे.