आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई. काजोलने नुकतेच हॉलिडेचे नवीन फोटोज पोस्ट केले आहेत. या फोटोजमध्ये काजोल आपल्यापेक्षा दुप्पट उंचीच्या जोकरसोबत वाइन पॅक चीअर करताना दिसतेय. पत्नी काजोल जोकरसोबत मस्ती करतेय हे पाहून पुढच्या फ्रेममध्ये अजय पळतच आला आणि विचित्र वागू लागला. खरेतर अजय आणि काजोल नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मालदीव येथे गेले होते. हे कपल तेथूनच हॉलिडे फोटोज शेअर करत आहेत. या दोघांनी नुकतेच काही फॅमिली फोटोज शेअर केले होते. यामध्ये अजय आणि काजोल मुलगी न्यासा आणि मुलगा युगसोबत वेळ घालवताना दिसत होते.
तर स्विमसूटमध्ये दिसली ऐश्वर्या राय
- न्यू ईयर 2019 सुरुवातीला आठवणीतील बनवण्यासाठी सर्व लोकांनी वेगवेगळ्या पध्दतींनी सेलिब्रेशन केले. ऐश्वर्या रायनेही पती अभिषेक बच्चन आणि आराध्यासोबत नवीन वर्ष सेलिब्रेट केले.
- अभिषेकने न्यू ईयरला इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज पोस्ट केले आहे. फोटोजमध्ये ऐश्वर्या ब्लॅक कलरच्या स्विमसूटमध्ये दिसतेय.
- बोल्ड लूकमध्ये दिसलेल्या ऐश्वर्याने पती-मुलगीसोबत बीचवर न्यू ईयर एन्जॉय केले. फोटोज शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.