Home | News | Aishwarya Rai Bachchan To Receive Women In Film India's Meryl Streep Award For Excellence In Washington DC

ऐश्वर्या राय बच्चन ठरली मेरिल स्ट्रीप अवार्ड फॉर एक्सीलेन्स मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 08, 2018, 02:54 PM IST

भारतीय चित्रपटसृष्टीतून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मेरिल स्ट्रीप एक्सीलेंस अवार्डसाठी निवड झाली आहे.

 • Aishwarya Rai Bachchan To Receive Women In Film India's Meryl Streep Award For Excellence In Washington DC

  बॉलिवूड डेस्कः चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत उत्कृष्ट काम करणा-या अभिनेत्रींना सन्मानित करण्यासाठी वुमेन इन फिल्म अँड टेलिव्हिजन (WIFT) इंडिया अवार्ड सुरु झाले आहे. या अवॉर्डअंतर्गत बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या बेस्ट अॅक्ट्रेसची निवड केली जाते. भारतीय चित्रपटसृष्टीतून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची मेरिल स्ट्रीप एक्सीलेंस अवार्डसाठी निवड झाली आहे. हा सन्मान मिळवणारी ऐश्वर्या पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.


  वॉशिंग्टनमध्ये होणार सोहळा : हा अवार्ड सोहळा 8 सप्टेंबर रोजी को वॉशिंग्टन डीसीच्या हयात रीजेंसीमध्ये होणार आहे. हा अवॉर्ड हॉलिवूडची वेटरन अॅक्ट्रेस

  मेरिल स्ट्रीपच्या ऑनरमध्ये दिला जातो. WIFT इंडिया, WIFT इंटरनॅशनलची एख शाखा आहे. ज्यामध्ये चित्रपट, टीव्ही, व्हिडियो आणि इतर मीडियात

  काम करणा-या महिलांना प्रोत्साहित केले जाते.

  यांच्या नावाचा समावेश : ऐश्वर्या रायशिवाय फिल्म मेकर जोया अख्तर आणि धडक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या जान्हवी कपूरला या सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे. हा अवॉर्ड सोहळा 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत चालणा-या साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलसोबत होणार आहे.

  - 1998 मध्ये मेरिल स्ट्रीप यांना WIF क्रिस्टल अवार्डने सन्मानित केले गेले होते.

Trending