आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या रायचा पॅरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉकद्वारे डेब्यू; 18 वर्षांपासून लॉरियालची आहे ब्रँड अॅम्बेसेडर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - ऐश्वर्या राय बच्चनने लॉरियाल पॅरिस ले डिफायल शोमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी तिने इटालियन डिझायनर गिएमबटिस्टा वल्लीने डिझाईन केलेला आउटफिट परिधान केला होता. पर्पल ड्रेसमध्ये ऐश्वर्या अतिसुंदर दिसत होती. ऐश्वर्याचे या रॅम्प वॉकद्वारे पॅरिस फॅशन वीकमध्ये पदार्पण होते. 
 

असा होता ऐश्वर्याचा लुक :
ऐश्वर्याने इवा लॉन्गोरिया, केमिला कबेलो, हेलेन मिरेन, गॅरी हॉर्नर, अॅम्बेर हर्ड, डाउटजेन क्रोईस आणि लिया कॅबॅडॅटसोबत आपली अदाकारी केली. यावेळी ऐश्वर्या लिलेक प्रिंटेड स्मोक ड्रेस परिधान केला होता. हा हाय नेक ड्रेस झालरसोबत डिझाईन केला होता. सोबतच यामध्ये एक लांब ट्रेल होती. या ट्रेलमुले या ड्रेसला क्लासिक लुक आला होता. तिचे व्हाइट रफल्ड शुज तिच्या लुकला पूर्ण करत होते. 
 

18 वर्षांपासून लॉरियालची आहे ब्रँड अॅम्बेसेडर 
पॅरिस फॅशन वीकचे आयोजन ऐतिहासिक संस्थान  मोनाई डे पॅरिस येथे करण्यात आले होते. ऐश्वर्या राय मागील 18 वर्षांपासून लॉरियाल पॅरिसची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. तसेच ती दरवर्षी कान्स चित्रपट महोत्सवात ब्रँडला सादर करत असते. 

बातम्या आणखी आहेत...