Home | Reviews | Movie Review | Aishwarya Rai To Anil Kapoor And Rajkumar Rao Starrer Film Fanney Khan Movie Review

Movie Reviews: जसे आहात तसे स्वतःला स्विकारा, हाच मॅसेज देतो ऐश्वर्या-अनिलचा 'फन्ने खां'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 04, 2018, 10:49 AM IST

राकेश ओम प्रकाश मेहराचे प्रोडक्शन आणि अतुल मांजरेकरच्या डायरेक्शनमध्ये 'फन्ने खां' हा चित्रपट तयार झाला आहे.

 • Aishwarya Rai To Anil Kapoor And Rajkumar Rao Starrer Film Fanney Khan Movie Review
  क्रिटिक रेटिंग 3.5/5
  स्टार कास्ट ऐश्वर्या राय, अनिल कपूर, राजकुमार राव, पिहू सेंड
  दिग्दर्शक अतुल मांजरेकर
  निर्माते भूषण कुमार, राकेश ओमप्रकाश मेहरा, अनिल कपूर, राजीव टंडन
  जॉनर म्यूजिकल कॉमेडी ड्रामा
  कालावधी 129 मिनिटे

  'फन्ने खां'ची कथा: राकेश ओम प्रकाश मेहराचे प्रोडक्शन आणि अतुल मांजरेकरच्या डायरेक्शनमध्ये 'फन्ने खां' हा चित्रपट तयार झाला आहे. हा चित्रपट बेल्जियन डायरेक्टर डोमिनिक डेरडेरच्या 'एव्हरीबडी फेमस' चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात वडील आणि मुलीची कथा सांगण्यात आली आहे. हिंदी चित्रपटात हे नाते खुप कमी दाखवले जाते. आपण हिंदी चित्रपटात फक्त आदर्श आईलाच बघतो. मुलांच्या आयुष्यात वडिलांचे महत्त्व खुप कमी दाखवले जाते. फन्ने खां उर्फ प्रशांत शर्मा(अनिल कपूर) यांना लता(पिहू सेंड) ही ओव्हरवेट मुलगी आहे. त्यांना वाटते की, त्यांच्या मुलीमध्ये खुप सिंगिंग टॅलेंट आहे. परंतू दूसरे कुणाला असे वाटत नाही. फन्ने स्वतः एक सिंगर आहे. त्यांचे आयडियल मोहम्मद रफी साहेब आहेत, त्यांना त्यांच्याप्रकारे नाव मोठे करायचे होते. परंतू ते होऊ शकले नाही. जसे जास्तीत जास्त भारतीय पालक करतात तसेच फन्नेला स्वतःचे अपुर्ण राहिलेले स्वप्न मुलीव्दारे पुर्ण करायचे असते. यामुळे त्यांनी लता मंगेशकर यांच्याकडून प्रेरित होऊन मुलीचे नाव लता ठेवले. मुलगी एक चांगल्या सिंगरच्या रुपात मोठी होते. परंतू ओव्हरवेट असल्यामुळे ती स्टेज फ्रेंडली नसते. लताला वाटते की, तिच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न पुर्ण होण्याचे काहीच चान्स नाही. तिची आई (दिव्या दत्ता)ला सुध्दा वाटत नाही की, हे स्वप्न पुर्ण होईल. सेक्सी सिंगर बेबी सिंह (ऐश्वर्या राय) ही लताची आयडियल आहे. परंतू ती तिच्यासारखे बनण्याचा विचारही करु शकत नाही. लताने मोठी सिंगर बनावे यासाठी तिचे वडील तिच्यावर खुप दबाव टाकतात. यामुळे मुलगी त्यांचा व्देष करु लागते. यासोबतच कुणाचाही सपोर्ट न मिळाल्यामुळे ती फ्रस्टेड होते. तेव्हाच फन्ने हा आपल्या मुलीचे नशीब पालटण्यासाठी एक मोठा निर्णय घेतो. तो आपला मित्र अधीर (राजकुमार राव)ला पिहूची मदत करण्यास सांगतो.

  पुढील स्राइडवर क्लिक करुन वाचा सविस्तर समिक्षण...

 • Aishwarya Rai To Anil Kapoor And Rajkumar Rao Starrer Film Fanney Khan Movie Review

  'फन्ने खां'चा रिव्ह्यू


  चित्रपटाची कथा खुप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही फन्ने खांच्या आयुष्यात बुडून जातात. चित्रपटाचे डायरेक्शन आणि अनिल कपूरचा अभिनय उत्तम आहे. फन्ने जेव्हा म्हणतो की, माझा एकच उद्देश आहे की, माझ्या मुलीचा आवाज लाखो लोकांपर्यंत पोहोचावा तेव्हा तुम्ही फन्ने खांचे सामान्य जीवन आणि असामान्य स्वप्नांमध्ये गुंतून जाता. अतुल मांजरेकर हे फन्ने खांची लोअर मिडिल क्लास लाइफ पडद्यावर दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. फन्ने एका चाळीत राहतो आणि फॅक्ट्रीत काम करतो. अनिल कपूर फन्नेच्या भूमिकेत फिट बसले आहे. एक सामान्य व्यक्ती कठीण परिस्थितींवर मात करुन जगण्याचे बळ कायम ठेवतो. त्यांनी फन्ने खांची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. राजकुमार रावची भूमिकाही चांगली आहे. काही सीनमध्ये दोघंही एकत्र आहेत, हे सीन भन्नाट झाले आहेत. यंग टॅलेंट पिहूने आपल्या पहिल्या चित्रपटाची शानदार सुरुवात केली आहे. तिचा चार्म, अभिनय आणि सुंदरता मन जिंकून घेते. ऐश्वर्याने ग्लॅमरस स्टारची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. 

   

   

 • Aishwarya Rai To Anil Kapoor And Rajkumar Rao Starrer Film Fanney Khan Movie Review

  कथेचा पहिला भाग तुम्हाला बांधून ठेवतो. परंतू दूस-या भागात कथा भरकटताना दिसते. कथेचा क्लायमॅक्स ओढून ताणून केलेला वाटतो. अमित त्रिवेदीचे म्यूझिक चांगले आहे. अनेक गाण्यांवर पाय थिरकतात. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये मोनाली ठाकुरने गायलेले गाणे चित्रपटाला दूस-या लेव्हलपर्यंत घेऊन जाते. 

   

   

 • Aishwarya Rai To Anil Kapoor And Rajkumar Rao Starrer Film Fanney Khan Movie Review

  का पाहावा हा चित्रपट 


  - अनिल कपूरचा उत्तम अभिनय पाहण्यासाठी चित्रपट नक्की बघावा.
  - "स्वतःला स्वीकारा आणि दूस-यांनाही, बाहेरच्या रंग-रुपाने कुणाला जज करु नका." हा अमूल्य संदेश चित्रपटातून मिळतो. यामुळे तुम्ही चित्रपट नक्की पाहावा.
   

 • Aishwarya Rai To Anil Kapoor And Rajkumar Rao Starrer Film Fanney Khan Movie Review

Trending