आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा अभिषेक बच्चनने मैफिलीत उडवली होती सलमान खानची खिल्ली, तर खळखळून हसली होती ऐश्वर्या राय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. अभिषेक बच्चनने नुकतेच आपल्या वयाचे 43 वर्षे पुर्ण केले. 5 जानेवारी, 1976 मध्ये मुंबईत त्याचा जन्म झाला. अभिषेक आपल्या प्रोफेशनल लाइफपेक्षा जास्त पर्सनल लाइफमुळे चर्चेत असतो. त्याच्या आयुष्यासंबंधीत एक किस्सा खुप चर्चेत राहिला होता. अभिषेकने एका अवॉर्ड शोमध्ये सर्वांसमोर सलमान खानची खिल्ली उडवली होती. विशेष म्हणजे सलमानची खिल्ली उडवल्यावर ऐश्वर्या खुप हसली होती. 

 

असे आहे पुर्ण प्रकरण 
जानेवारी 2017 मध्ये झालेल्या सैन्सुई स्टारडस्ट अवॉर्डदरम्यान अमिताभ बच्चन आपल्या पुर्ण कुटूंबासोबत येथे पोहोचले होते. इव्हेंटमध्ये सलमान खान आणि त्याचे फॅमिली मेंबर्सही उपस्थित होते. अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख हा अवॉर्ड शो होस्ट करत होते. याच काळात अभिषेक बच्चनने नोव्हेंबर, 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीचा विषय हाताळला. अभिषेक म्हणाला - जर बॉलिवूडचे स्टार्स सामान्य लोकांप्रमाणे रांगेत उभे राहिले असते तर काय झाले असते? सलमान बँकच्या रांगेत उभा न राहताच आत गेला असता आणि म्हणाला असता की, "मुझ पर एक एहसान करना की, मुझपर कोई एहसान मत करना" सलमानचे नाव घेताच कॅमेरा ऐश्वर्या रायवर फोकस झाला तर ती या कमेंटनंतर हसताना दिसली होती. यानंतर अभिषेक आपले वडील अमिताभविषयी म्हणाला की, - जर ते रांगेत असते तर ते म्हणाले असते की, हम जहां खड़े होते हैं लाइन वहीं से शुरू होती है. खरंतर अभिषेक हे सर्व मस्करीत बोलला होता आणि फंक्शनमधील सर्व लोक यावर खुप हसले होते. 

 

एकेकाळी होते सलमान ऐश्वर्याचे अफेअर 
1999 चा सुपरहिट चित्रपट 'हम दिल चुके सनम'च्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्या जवळ आले होते. जवळपास दोन वर्षे त्यांचे नाते चालले आणि नंतर त्याचे ब्रेकअप झाले. तेव्हापासून आतापर्यंत ते एकत्र काम करणे दूरच तर समोरासमोरही येत नाहीत. ऐश्वर्या रायने स्वतः दावा केला होता की, सलमानच्या वायलेंट बिहेवियर आणि फिजिकल अब्यूजमुळे तिने ब्रेकअप केले. ऐश्वर्या सांगते की, ब्रेकअप झाल्यानंतर सलमान माझ्यासोबत वेड्यासारखा बोलायचा. तो माझ्यावर संशयही घ्यायचा. त्या काळात अभिषेक बच्चन आणि शाहरुख खानसारख्या मोठमोठ्या कलाकारांसोबत काम करत होते. 


 

बातम्या आणखी आहेत...