Home | Gossip | aishwarya roy is getting trolled because of her daughter aradhya

मुलगी आराध्याला कडेवर घेऊन ऐश्वर्याने केले लाड तर सोशल मीडिया यूजर्स उडवू लागले खिल्ली, एक जण म्हणाला, 'अभिषेक एवढी उंच झाली तरीही कडेवर घ्यावे लागते आहे'

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 13, 2019, 11:47 AM IST

'माझा दीड वर्षांचा मुलगा आहे, तो सुद्धा स्वतः चालतो' - एक यूजर

 • aishwarya roy is getting trolled because of her daughter aradhya

  मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्याची क्यूट बॉन्डिंग अनेकदा पाहायला मिळते. ऐश्वर्या जिथेही जाते, तिची मुलगी नक्की तिच्यासोबत असते. एवढेच काय तर मागच्यावर्षी कान्स फिल्म फेस्टिवलमधेही आराध्या ऐश्वर्यासोबत दिसली होती. अशातच ऐश्वर्या आणि आराध्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या मुलीला कडेवर घेऊन तिचे लाड करताना दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर यूजर्सने आई मुलीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मात्र हा फोटो मागच्यावर्षीच्या कान्स फेस्टिवलदरम्यानचा आहे असे सांगितले जाते आहे.

  अभिषेक एवढी उंच झालीये तरीही कडेवर घ्यावे लागते...
  फोटो पाहिल्यानंतर वसुधा डालमिया नावाची एक यूजर म्हणाली, 'हि अभिषेक एवढी उंच झाली आहे तरीही तिला कडेवर घ्यावे लागते आहे.' तसेच नीता माहेश्वरी नावाच्या आणखी एका यूजरने लिहिले, 'एवढ्या मोठ्या मुलीला कडेवर घेऊन का फिरते आहे ? माझा दीड वर्षांचा मुलगा आहे, तोही स्वतः चालतो.' आणखी एकाने लिहिले, 'कडेवरच्या मोठी झाली, किती देखावा करतात हे लोक.'

  मुलीसाठी याआधीही ट्रोल झाली आहे ऐश्वर्या...
  - सप्टेंबर 2018 मध्ये ऐश्वर्या मुलीसोबत 'मेरिल स्ट्रीप अवार्ड' घेण्यासाठी अमेरिकेला गेली होती. तिथून परतताना जेव्हा ती मुलगी आराध्यासोबत एयरपोर्टच्या बाहेर आली होती तेव्हा लोकांनी तिला आराध्याचा हात धरून आणताना पहिले. आराध्याचा हात धरलेला पाहून लोक कमेंट करू लागले. सोशल मीडिया यूजरने ऐश्वर्याला ओव्हर प्रोटेक्टिंग मदर म्हंटले आणि लिहिले, "तिने तिच्या मुलीला नॉर्मल मुलांसारखे सोडले पाहिजे."

  - आणखी एका यूजरने तर आराध्याची तुलना तैमूरसोबत केली. त्याने लिहिले, 'मला नाही वाटत आराध्या नॉर्मल चाइल्ड आहे, ती नेहमी घाबरलेलीच दिसते. आराध्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्ट तर तैमूर आहे." एवढेच मनही तर एका यूजरने तर ऐश्वर्याला हेदेखील म्हणले की, ती आराध्याचा कॉन्फिडन्स करते आहे.

  आराध्यासाठी खूप प्रोटेक्टिव आणि पजेसिव आहे अभिषेक...
  मुलगी आराध्यासाठी अभिषेक बच्चन खूप प्रोटेक्टिव आणि पजेसिव आहे. काही दिवसांपूर्वी एका एक ट्विटर यूजर शेरियन पटेदियनने कमेंट करून अभिषेकला विचारले होते की, ''`तुमची मुलगी शाळेत जात नाही का ? मी खूप हैरान आहे की, अशी कोणती शाळा आहे, जे कधीही मुलीचा आईसोबत ट्रिपला जाण्यासाठी परमिशन नेहमी. नाहीतर तुम्ही तिला ब्यूटी विदआउट ब्रेन्स बनवू इच्छित. ती नेहमीच आईच्या हातात हात घालून फिरत असते. तिचे बालपण नॉर्मल मुलांपेक्षा खूप वेगळे आहे. यावर अभिषेक भडकला होता आणि त्याने उत्तरात लिहिले, "मॅम जसे मला माहित आहे त्यावरून अनेक शाळा वीकेंडला बंद असतात आणि आराध्या वीकडेजलंका शाळेत जाते."

Trending