Home | Jeevan Mantra | Dharm | Aja Ekadashi 2018 Astrological Measures

आज जुळून येत आहेत 2 शुभ योग, 1 उपायाने दूर होऊ शकतात तुमचे वाईट दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 10:52 AM IST

श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा किंवा जया एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्

 • Aja Ekadashi 2018 Astrological Measures

  श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला अजा किंवा जया एकादशी म्हणतात. धर्म ग्रंथानुसार या एकादशीचे महत्त्व स्वतः भगवान श्रीकृष्णाने धर्मराज युधिष्ठिरला सांगितले होते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार ही एकादशी सर्व पापांचा नाश करणारी आहे. यावेळी गुरुवार (6 सप्टेंबर) ही एकादशी आली आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि काही खास उपाय केल्यास व्यक्तीचा वाईट काळ दूर होऊ शकतो.


  जुळून येत आहेत 2 शुभ योग
  पं. शर्मा यांच्यानुसार यावेळी जया एकादशीला सर्वार्थसिद्धी योग दिवसभर राहील. या योगामध्ये करण्यात आलेल्या पूजा आणि उपायाने शुभफळ प्राप्त होऊ शकतात. यासोबतच दुपारी 1 वाजता अमृतसिद्धी योग सुरु होईल आणि दिवसभर राहील. या दोन्ही योगामध्ये एकादशीची पूजा अत्यंत फलदायक ठरते.


  व्रत विधी
  योगिनी एकदाची व्रत नियमाचे पालन दशमी तिथी (8 जुलै, रविवार)ला रात्रीपासून सुरु करावे. दशमी तिथीला जेवणात तामसिक पदार्थांचे सेवन करू नये आणि पूर्ण ब्रह्मचर्यचे पालन करावे.


  एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान करून पवित्र होऊन भगवान विष्णूच्या प्रतिमेसमोर बसून संकल्प घ्यावा.


  - एकादशीच्या दिवशी उपवास करावा म्हणजेच काहीही खाऊ नये. हे शक्य नसल्यास एकदा फलाहार करावा.


  - त्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. (तुम्हाला पूजा करणे शक्य नसल्यास एखाद्या योग्य ब्राह्मणाकडून पूजा करून घ्यावी)


  - श्रीविष्णूने पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर धूप-दीप दाखवून नैवेद्य दाखवावा. विष्णू सहस्त्रनामचा पाठ करावा.


  - दिवसभर शांत मनाने देवाचे स्मरण करत राहावे. संध्याकाळी पुन्हा विष्णूंची पूजा करावी.


  - रात्री भगवान विष्णूंची कथा ऐकावी. जागरण करावे. या व्रताचे समापन एकादशीला होत नाही तर द्वादशीला सकाळी ब्राह्मणाला अन्नदान आणि दक्षिणा दिल्यांनतर हे व्रत समाप्त होते.


  - या विधीनुसार जया एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.


  हा उपाय करावा
  एकादशीच्या दिवशी संध्याकाळी भगवान विष्णूंचा केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा आणि खीर नैवेद्य दाखवावी. नैवेद्यामध्ये तुळशीची पाने अवश्य टाकावीत. तुळस संध्याकाळी तोडू नये, त्यापूर्वीच तोडून घरात ठेवावी.

Trending