आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय बहल यांचा 'सेक्शन ३७५' एक सूचक चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय बहल यांचा 'सेक्शन ३७५' जेवढ्या प्रश्नांची उत्तरे देतो त्याहून अधिक प्रश्न उपस्थित करतो. पुराव्यांवरून न्यायाधीश निकाल देतात, कारण न्यायव्यवस्थेचा तो अविभाज्य घटक आहे. आपल्या सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेचे हे विशेष आहे की, ते धनिकांच्याच बाजूने उभे असतात. पुरावे जमवले जातात आणि ते पुन्हा पुसलेही जातात. अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांच्या 'पिंक'मध्ये बचाव पक्षाचा वकील म्हणतो की, आमच्या अशिलाने 'नो' म्हटलेले असून त्याने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी विरोध दर्शवला होता आणि 'नो' हा केवळ शब्द नसून एक पूर्ण वाक्य आहे.   अजय बहलच्या या चित्रपटात एक मुलगी तिच्यासोबत झालेल्या बलात्काराविरोधात खटला दाखल करते. तिच्या शरीरावरील जखमाही न्यायालयात या घटनेनंतरच्या भावाकडून झाल्याच्या मारहाणीत झाल्या असाव्यात असा निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे ती शेवटी लिफ्टचा वापर न करता पायऱ्यांनी उतरण्याचे ठरवते व शरीराच्या त्या भागावर जखमा व्हाव्यात, जेथे भाऊ मारहाण करू शकणार नाही म्हणून तो भाग पायऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या रेलिंगवर घासते. या मुलीला जगण्याची साधने जमा करायची आहेत. तिचे वयोवृद्ध आईवडील काम करू शकत नाहीत आणि भाऊदेखील बेरोजगार आहे. त्यामुळे ती चित्रपट युनिटच्या वस्त्र विभागात सहायक म्हणून नोकरी स्वीकारते. चित्रपटाचा दिग्दर्शक स्त्रीलंपट असून त्याला ही मुलगी विवाहित असल्याचे माहीत नाही. त्याची बायको सोडून गेलेली आहे. पण या खटल्यावेळी ती त्याच्या बाजूने उभी आहे. बलात्काराच्या बऱ्याच खटल्यात बायका नवऱ्याची आर्थिक बाजू भक्कम असल्याने त्यांच्या पतीच्या बाजूने उभारतात. तो स्त्रीलंपट असल्याचे पत्नीला माहीत आहे. महेश भट्‌टच्या 'गँगस्टर'मध्ये नायक आपल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या आरोपात दोषी सापडतो. या चित्रपटात निर्भया प्रकरणानंतर नियमात झालेल्या बदलांचाही वापर केला आहे. आधीच निर्णय घेत न्यायालयाच्या बाहेर उभा असलेला प्रक्षोभक जनसमुदाय, जो आपल्या आंदोलक वृत्तीमुळे प्रभावित करू इच्छितो. सध्याला अशा प्रवृत्तीच आपली मनमानी करत आहेत, जी पूर्वनियोजित असते. सोशल मीडियावरून झालेले मत या सर्व निर्णयांना प्रभावित करते, असे यात दर्शवण्यात आलेले आहे. 'मीटू' आरोप झालेल्या एका दिग्दर्शकासोबत आमिर खानने काम करण्याचा नुकताच करार केला आहे. तो सुभाष कपूरसोबत का काम करतोय? याचा विराेध होत आहे. 'बुरे फंसे ओबामा' आणि 'जॉली एलएलबी भाग दो'चे दिग्दर्शन सुभाष कपूर यांनी केले होते. आमिर खान सुभाष कपूरच्या कौशल्याने प्रभावित असून व्यक्तिगत हेव्यादाव्यातून त्यांच्यावर मीटूचा अारोप लावल्याचे तो म्हणतो. निर्मात्याने विवाहित असल्याचे लपवले त्यामुळे या चित्रपटातही युवतीच्या मनात बदला घेण्याची भावना आहे. अन्याय आणि असमानतेवर आधारित व्यवस्था बेरोजगारीच्या समस्येचे निदान करण्यात सक्षम नाहीत आणि जगण्यासाठी मनुष्य वाटेल ते करावयास तयार व्हावा अशा परिस्थिती निर्माण करण्यात येत आहेत. काही वर्षांपूर्वी आलेल्या अनीज बज्मी यांच्या 'दीवाना' चित्रपटात गुन्हेगार निर्दोष सुटतो. त्याच प्रकारे सनी देओल आणि इरफान खान अभिनीत 'राइट या राँग' चित्रपटातही आरोपी सुटतो. 'सेक्शन ३७५' एक सूचक चित्रपट असून १०० मिनिटे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्याच्यात आहे. भारतीय समाजाच्या तंदूरमध्ये स्त्रीलंपटपणाचे निखारे पेटतेच आहेत आणि पुराणकथांच्या चुकीचे भाषांतराने याला हवा देण्याचे काम केले आहे.