आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajay Devgan Becomes A Football Coach In 'Maidan', Shared A Poster And Wrote 'alone One Is Enough To Make A Change'

'मैदान' मध्ये फुटबॉल कोच बनला अजय देवगण, पोस्टर शेअर करून लिहिले, 'बदल घडवण्यासाठी एकटाच पुरेसा आहे'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : इंडियन फुटबॉलचा गोल्डन पीरियड आणि त्याच्या सर्वात मोठ्या कोचच्या कथेवर बनत असलेला चित्रपट 'मैदान' मधून अजय देवगणचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. यामध्ये अजय एका हातात छत्री आणि बॅग घेऊन फुटबॉलला किक करताना दिसत आहे. पोस्टर शेअर करून अजयने लिहिले - बदल आणण्यासाठी एकटाच पुरेसा आहे. चित्रपट 27 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. 

चित्रपटाच्या प्लॉटबद्दल बोलायचे झाले तर हा भारतीय फुटबॉल टीमचे यशस्वी कोच सैय्यद अब्दुल रहीम यांची कथा असू शकते. मात्र पोस्टरवरून हे स्पष्ट होत नाही, पण सैय्यद अब्दुल रहीम यांच्या प्रशिक्षणामध्येच भारतीय टीम एशियाची सर्वोत्कृष्ठ टीम बनली होती. 1951 ते 1962 च्या काळाला भारतीय फुटबॉलचे सुवर्ण युग मानले जाते. 1956 च्या मेलबर्न ओलम्पिक खेळांमध्ये भारताने चौथे स्थान मिळवले होते. हे भारतीय फुटबॉल टीमचे सर्वात मोठे यश होते.  सैय्यद यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला होता. ते हैदराबाद सिटी पोलिसाचे कोचसोबतच टीम इंडियाचे कोचदेखील होते. मात्र त्यांचा मृत्यू कॅन्सरमुळे 1963 मध्ये झाला होता. पण तोपर्यंत ते भारतीय फुटबॉल टीमचे कोच होते. 

बोनी कपूर, झी स्टूडियोज आणि फ्रेशलाइम फिल्म्सच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेला चित्रपट 'मैदान' 27 नोव्हेंबर 2020 ला रिलीज होईल. हा चित्रपट 4 भाषांमध्ये म्हणजेच हिंदी, तमिळ, तेलगु मल्याळम या भाषांमध्ये बनत आहे. डायरेक्शन अमित रविन्द्रनाथ शर्मा यांचे असेल. 

बातम्या आणखी आहेत...