आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ajay Devgan Did Not Charge Fees For Rajamouli's RRR, Turned Down Offer Of Producer

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजय देवगणने मैत्रीखातर राजामौलींच्या 'आरआरआर' साठी घेतली नाही फी, निर्मात्यांची ऑफर नाकारली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता अजय देवगणने अलीकडेच दिग्दर्शक एस.एस. राजामौलींच्या आगामी 'आरआरआर' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार त्याने या चित्रपटासाठी कोणतेही मानधन घेतले नाही. राजामौलींशी असलेल्या मैत्रीच्या कारणास्तव अजयने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. यापूर्वी त्याने राजामौलींनी दिग्दर्शित केलेल्या ‘ईगा’ (2012) या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी व्हॉईसओव्हर दिला आहे.

निर्मात्यांनी ऑफर केली होती फी 

रिपोर्टनुसार, 'आरआरआर'चे निर्माता डीव्हीव्ही दानय्या यांनी जेव्हा चित्रपटातील कॅमिओसाठी अजयला विचारणा केली तेव्हा फीसुद्धा ऑफर केली होती. पण अजयने पैसे घेण्यास नकार दिला. नंतर निर्मात्यांनी अजय देवगणला त्याची कॅमिओसाठी मार्केट व्हॅल्यूदेखील ऑफर केली होती, पण अजय त्यासाठीही तयार झाला नाही.

अजय देवगणचा साऊथचा पहिला चित्रपट

अजय देवगण 'आरआरआर' च्या माध्यमातून दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. या चित्रपटात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटात श्रीया सरन त्याच्यासोबत आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत. पुढील वर्षी 8 जानेवारीला हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होईल.