आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

 हर एक मराठा में छुपा है लाख मराठा.... 'तानाजी द अनसंग वॉरियर'चा दमदार ट्रेलर रिलीज 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'तानाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे.  दुपारी 1 वाजून 47 मिनिटाला हा ट्रेलर रिलीज करण्यात आला.  ट्रेलर दमदार असून संवादही लक्षात राहणारे आहेत.  हिंदवी स्वराज्याच्या लढ्यातील 'सिंह' तानाजी मालुसरे यांचा पराक्रम या चित्रपटात बघायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगणने तानाजी मालुसरेंची भूमिका यात वठवली आहे.  p> कोंढाणा किल्ला सर करण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावर सोपवल्याचं कळताच, मुलाचं लग्न बाजूला ठेवून तानाजी मालुसरे सज्ज झाले होते. 'आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं' अशी गर्जना करत ते मोहीम फत्ते करण्यासाठी गेले होते. त्यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे मावळ्यांनी किल्ला जिंकलासुद्धा; पण शत्रूशी बेभान होऊन लढताना हा सिंह धारातीर्थी पडला होता. त्यांचा हा पराक्रम दिग्दर्शक ओम राऊतने मोठ्या पडद्यावर चित्रीत केला आहे.  या चित्रपटातून अजय देवगण आणि काजोल ही रिअल लाईफ जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. चित्रपटात काजोलने तानाजींची पत्नी सावित्रीबाई मालसुरेंची भूमिका वठवली आहे. अजय आणि काजोलसह शरद केळकर, सैफ अली खान, पद्मावती राव, अजिंक्य देव  यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात आहेत. शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका वठवली आहे. तर पद्मावती राव यांनी जिजामाताची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. ‘तानाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे. 150 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल 13 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.