आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रीम प्रोजेक्ट : अखेर मुहूर्त लागला, अजयने सुरु केली 'तानाजी मालुसरे'ची शूटिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजय देवगणने आपल्या ड्रीम प्रोजेक्ट 'तानाजी: द अनसंग वॉरिअर' चित्रपटाचे शूटिंग मंगळवारी सुरू केले. बऱ्याच दिवसांपासून याची तारीख पुढे ढकलत चालली होती. निर्माते भूषण कुमारसोबत तो या चित्रपटाची निर्मिती करत आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट पुढील वर्षी 22 ऑक्टोबर रोजी रिलीज होईल. या चित्रपटाची कथा शिवाजी महाराजांचे शूर सेनापती तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित आहे. चित्रपटात अजय तानाजीची भूमिका साकारणार आहे. 1670 मध्ये झालेल्या युद्धात त्यांनी आपल्या जिवाची बाजी लावली होती. अजयने नुकतेच आकिव अलीच्या रोमांटिक कॉमेडी 'दे दे प्यार दे'चे शूटिंग पूर्ण केले. 

 

बातम्या आणखी आहेत...