आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Ajay Devgan To Be Invest Rs 600 Crore Into Multiplex Chain Plan To Open Nearly 250 Screens In India

अजय देवगन सुरू करणार नवा व्यवसाय, 600 कोटींची गुंतवणूक करून उघडणार 250 मल्टीप्लेक्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन चित्रपटांनंतर आता मल्टीप्लेक्सची साखळी सुरू करण्याची तयारी करत आहे. त्याने 'एन-वाय' सिनेमाहॉल या नावाने चित्रपटग्रहांची सुरूवात केली असून, या व्हेंचरचे नाव आपल्या दोन्ही मुलांची 'न्यासा' आणि 'युग' ही नावे जोडून ठेवले आहे. या व्हेंचर अंतर्गत अजय सुमारे 250 स्क्रिन्स सुरू करणार आहे. अजयच्या मल्टीप्लेक्सचा पहिला चित्रपट मध्यप्रदेशच्या रतलाममध्ये याच वर्षी दाखवण्यात येईल. 
  
अजय पुर्वीपासूनच या व्यवसायात

अजयसाठी मल्टीप्लेक्सचा व्यवसाय काही नवीन नाही. त्यांनी यापुर्वीच उत्तरप्रदेशच्या हापुड आणि गाजियाबादमध्ये दोन सिंगल स्क्रिन खरेदी केलेल्या आहेत. अजय सध्या तरी या प्रोजेक्टमध्ये कोणालाही भागीदार करत नाहीये. पण त्याने सांगितले की, पहिल्या टप्प्यात 250 मल्टिप्लेक्स सुरू केल्यानंतर एखाद्या पार्टनरचा या प्रोजेक्टमध्ये समावेश करू शकतो.

चित्रपटांच्या अनेक व्यवसायात अजय देवगन
'मल्टीप्लेक्स' व्यतिरिक्त अजय देवगनचे प्रोडक्शन हाऊसदेखील आहे. जे 'अजय देवगन एफ' या नावाने आहे. या बॅनरखाली 'टोटल धमाल', 'पार्च्ड' आणि 'आपला माणुस" या चित्रपटासोबत टी.व्ही सीरीज 'स्वामी रामदेव एक संघर्ष' ही मालिका तयार करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त त्याची व्हिज्यूअल इफेक्ट्स 'एनवाय' या कंपनीने 'सिंबा', 'बाजीराव मस्तानी' आणि 'शिवाय' या चित्रपटांना व्हीएफएक्स दिले आहे.

हॉलिवूड चित्रपट सर्वात मोठे चॅलेंज
अजयचे मत आहे की, जर चित्रपट चांगला असेल तर लोक टि.व्ही.वर नाही तर चित्रपटग्रहात बघतात. हिंदी चित्रपटांची तुलना हॉलिवूड सोबत करणे योग्य नाही. 'अॅव्हेंजर'सारख्या चित्रपटाला अजय सर्वात मोठे आव्हान माणतो. 'अॅव्हेंजर' हा चित्रपट 5 हजार कोटींच्या बजेटमध्ये तयार केला आहे आणि आपले चित्रपट जवळपास 100 कोटींचे असतात.

बातम्या आणखी आहेत...