आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलीवूड डेस्क- अभिनेता अजय देवगन यांचे वडील वीरू देवगन यांचे मुंबईमध्ये आज निधन झाले. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. वीरू देवगन बॉलीवूडमधील प्रसिद्ध स्टंट आणि अॅक्शन कोरियोग्राफर आणि डायरेक्टर होते. त्यांनी सुमारे 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अॅक्शन सीन कोरियोग्राफ केले आहेत. त्याव्यतिरिक्त 'हिंदुस्तान की कसम' हा चित्रपटसुद्धा दिग्दर्शित केला होता.
वयाच्या 14 व्या वर्षी वीरू देवगन अमृतसरवरून मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे काही मित्रदेखील आले होते, पण मुंबईच्या स्ट्रगल लाईफमध्ये ते टीकू शकले नाहीत. पण वीरू यांनी हार मानली नाही आणि ते परिश्रम करत राहीले. मुंबईमध्ये स्ट्रगलदरम्यान त्यांनी गाड्या साफ केल्या, सुताराचे काम केले आणि लगोलग फिल्म स्टुडीओजच्या चक्करा मारर राहीले. अॅक्टर बनण्यासाठी आलेल्या वीरूंना हे समजले होते की, त्यांचा चेहरा चॉकलेट हिरोचा नाहीये त्यामुळे ते हिरो बनू शकणार नाहीत. त्यामुळे नंतर ते अॅक्शनकडे वळले आणि चित्रपटामध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करू लागले.
फक्त अॅक्शन आणि दिग्दर्शनच नाही तर त्यांनी अभिनेता म्हणून अनेक चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी क्रांती(1981), सौरभ(1979) आणि सिंहासन(1986) यांसारख्या चित्रपटामध्ये काम केले आहे. तसेच अॅक्शन डायरेक्टर म्हणून 'फूल और कांटे', 'हिम्मतवाला', 'प्रेम रोग', 'क्रांती', 'दो और दो पांच' या चित्रपटांमध्ये अॅक्शन डिरेक्टर म्हणून काम केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.