आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय देवगणने नाशिकच्या रामकुंडमध्ये विसर्जित केल्या वडिल वीरू देवगण यांच्या अस्थी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अजय देवगणने शनिवारी सकाळी आपले पिता वीरू देवगण यांच्या साठी नाशिकच्या रामकुंडात विसर्जित केल्या. यादरम्यान त्याला पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती. अजयने सरब विधि यथोचित पूर्ण करून अस्थींचे विसर्जन केले आणि नंतर तेथून निघून गेले. वीरू देवगण यांचे  निधन 27 मेला मुंबईमध्ये झाले होते. ते काही दिवसांपासून आजारी होते आणि नंतर त्यांना कार्डियाक अरेस्ट आला आणि ते 85 व्या वर्षी हे जग सोडून गेले. 

 

सर्वात जुने स्टंटमन होते वीरू... 
वीरूजी बॉलिवूडमधील सर्वात जुने अॅक्शन डायरेक्टर्स आणि स्टंटमनपैकी एक होते. त्यांनी 'सत्ते पे सत्ता', 'स्वर्ग से सुंदर', 'दस नंबरी', 'मिस्टर नटवरलाल', 'क्रांती', 'राम तेरी गंगा मैली', 'आखिरी रास्ता', 'मिस्टर इंडिया', 'फूल और कांटे', 'इश्क' यांसारख्या 80 पेक्षा जास्त चित्रपटात अॅक्शन कोरियोग्राफर म्हणून काम केले. 1999 मध्ये त्यांनी डायरेक्टर-प्रोड्यूसर म्हणून 'हिंदुस्तान की कसम' हा चित्रपट बनवला होता.   

बातम्या आणखी आहेत...