आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्क : सुमारे दीड वर्षांपूर्वी अजय देवगणने रणबीर कपूरसोबत दिग्दर्शक लव रंजनचा एक कॉमेडी चित्रपट साइन केला होता. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट पुढे ढकलला गेला होता आणि याचे कारण अजय या चित्रपटापासून दूर होणे आहे. पिंकव्हीलाने आपल्या रिपोर्टमध्ये सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे लिहिले आहे, "अजय देवगणने काही आठवड्यांपूर्वी चित्रपटातून आपले नाव काढले होते आणि आता त्याला कोणत्याही परिस्थितीत या चित्रपटात परतायचे नाही."
काही गोष्टींवर नाही सहमत
रिपोर्टमध्ये पुढे लिहिले गेले आहे की, "काही अशा गोष्टी होत्या, ज्यांच्यावर अजय आणि मेकर्स यांची सहमती झाली नाही. त्यामुळे त्याने यावर पुढे चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. चित्रपट पुढे जात होता, पण अजय यातून बाहेर झाल्यानंतर हा चित्रपट पूर्णपणे थांबला. दुसरीकडे लवनेदेखील हा चित्रपट बॅक कॉर्नर ठेवला आणि दुसऱ्या चित्रपटांवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे." मात्र याबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा झालेली नाही.
मीटूमध्ये नाव आल्यानंतर त्याचा संघर्ष वाढला...
मागच्यावर्षी मेमध्ये या चित्रपटाची अनाउंसमेन्ट केली गेली होती. पण ऑक्टोबरमध्ये लव रंजनवर एका अभिनेत्रीने #मीटू कॅम्पेन अंतर्गत लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला. अभिनेत्री म्हणाली ऑडिशनदरम्यान लवने तिला कपडे काढायला सांगितले होते. यानंतर अजय देवगणने घोषणा केली होती की, त्याची कंपनी (अजय देवगन फिल्म्स) आणि तो महिलांसोबत गैरवर्तन करणाऱ्या एकाही व्यक्तीसोबत उभा राहणार नाही. मात्र लव रंजनवर झालेले आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत आणि चित्रपट इंडस्ट्रीनेदेखील केवळ त्यांना बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे, जे आरोपी म्हणून सिद्ध झाले आहेत. त्यामुळे मानले जाते की, अजय त्याच्या चित्रपटटीवर काम सुरु ठेवणार आहे.
मागच्यावर्षी अजयने आकिव अलीच्या दिग्दर्शनात बनलेला चित्रपट 'दे दे प्यार दिया' मध्ये काम केले होते, ज्याचा प्रोड्यूसर लव रंजनच होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. मात्र जो चित्रपटात टाळल्याची गोष्ट समोर येत आहे, त्यामध्ये अजय आणि रणबीर पहिल्यांदा लवच्या दिग्दर्शनात काम करणार होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.