• Home
  • Off Screen
  • Ajay Devgn Pulls Up Prank On Fans By Putting Up Kajol Fake Number On Twitter

अजयने सोशल मीडियावर / अजयने सोशल मीडियावर Share केला काजोलचा Mobile नंबर; बोंबाबोंब उडताच मांडली हकीगत

दिव्य मराठी वेब टीम

Sep 25,2018 12:57:00 PM IST

बॉलिवूड डेस्क - अजय देवगणने आपली पत्नी काजोलचा व्हॉट्सअॅप नंबर सोमवारी सोशल मीडियार शेअर करून धुमाकूळ घातला होता. काजोलचा मोबाईल नंबर पाहून फॅन्स उत्साही झाले होते. परंतु, अनेकांनी अजयच्या या कृत्यावर टीका देखील केली. आपल्या फेमस पत्नीचा पर्सनल नंबर कुणी सोशल मीडियावर सार्वजनिक कसे करू शकतो असे अजय देवगणला सुनावले. या घटनेच्या काही तासांनंतर अजयने स्वतः यामागचे सत्य समोर आणले आहे. अॅक्शन हिरो ट्वीट करून म्हणाला, तो एक प्रँक होता. अर्थात जो मोबाईल नंबर सार्वजनिक करण्यात आला तो काजोलचा नव्हता. शेअर केलेला नंबर नेमका कुणाचा आहे हे अजयने स्पष्ट केले नाही.


अभिनेता अजय देवगणने सोमवारी एक मोबाईल नंबर आपल्या पत्नी काजोलचा असल्याचे म्हणत शेअर केला होता. हे ट्वीट त्याच्या व्हेरिफाइड अकाउंटवरुन संध्याकाळी 5.11 मिनिटांनी करण्यात आले होते. अजयने मोबाइल नंबर शेअर करुन ट्वीट केले, "काजोल सध्या भारतात नाहीये, तुम्ही तिच्याशी 98260XXXXX या तिच्या व्हॉट्सअॅप नंबरवर संपर्क साधू शकता." काजोलचा नंबर मिळताच फॅन्स खुश झाले. त्यांनी या मोबाईलवर मेसेजेसचा अक्षरशः पाऊस पाडला. एका फॅनने तर रीट्वीट करून हा नंबर मी फॅमिली ग्रुपमध्ये जोडतो आहे. माझी अख्खी फॅमिली काजोलची फॅन आहे. असे लिहिले होते. अजय अपकमिंग फिल्म 'दे दे प्यार दे' आणि 'टोटल धमाल' मध्ये दिसणार आहे. दोन्ही चित्रपटांचे शूटिंग सुरू आहे. तर काजोलचा आगामी चित्रपट 'हेलिकॉप्टर ईला' 12 ऑक्टोबर रोजी रिलीझ होत आहे. दरम्यान अजयच्या ट्वीटला काजोलने सुद्धा रीट्वीट करून आपल्याला प्रँक आवडला नाही असे म्हटले आहे.

X
COMMENT