आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajay Devgn Starer Tanhaji The Unsung Warrior First Song Shankara Re Shankara Release

'तान्हाजी'मधील पहिले गाणे रिलीज, 'शंकरा रे शंकरा'मध्ये अजय देवगणचा दिसला दमदार अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'तान्हाजी द अनसंग वॉरियर' या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले आहे. 'शंकरा रे शंकरा' हे बोल असलेले गाणे अभिनेता अजय देवगणवर चित्रीत झाले असून यात अजयचा दमदार अंदाज बघायला मिळतोय. सोमवारी अजयने त्याच्या इंस्टाग्रामवर या गाण्याचा टीजर शेअर केला होता. तर मंगळवारी गाण्याचा व्हिडिओ शेअर करुन, 'डंके की चोटपर बजेगा एकही नाही ##ShankaraReShankara!' असे कॅप्शन दिले आहे. या गाण्यात सैफ अली खानचीही झलक दिसतेय. 

मेहुल व्यास यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला असून त्यांनीच हे गाणे संगीतबद्धही केले आहे. अनिल शर्मा यांनी हे गाणे लिहिले आहे.

अजय देवगण आणि काजोलची प्रमुख भूमिका असलेल्या तान्हाजी चित्रपटाविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची कथा या चित्रपटात बघायला मिळणार आहे. ओम राऊत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अजय देवगणने तान्हाजींची भूमिका वठवली आहे. तर अभिनेत्री काजोल तान्हाजींची पत्नी  सावित्रीबाई मालसुरेंची भूमिकेत आहे. चित्रपटात सैफ अली खानही महत्त्वाच्या भूमिकेत असून तो राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री पद्मावती राव यांनी जिजामाताची भूमिका साकारली आहे. अभिनेता शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. 150 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने सैफ आणि अजयही तब्बल 13 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होणार आहे.