आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चपासून 'चाणक्य'वर काम करणार अजय, पुढे ढकलला 'दे दे प्यार दे' 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क.  अजय देवगणच्या हातात सध्या अनेक प्रकल्प आहेत. त्यापैकी बरेच तो स्वतः निर्मित करत आहे. अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र असल्यामुळे त्याचा 'टोटल धमाल' या वर्षावर येऊन ठेपला आहे. १५ मार्चला येणारा त्याचा दुसरा चित्रपट 'दे दे प्यार दे'देखील पुढे ढकलण्यात आला आहे. कारण २२ फेब्रुवारीला 'टाेटल धमाल' रिलीज होणार आहे आणि याच्या काही आठवड्यांनंतर 'दे दे प्यार दे' रिलीज होणार होता. त्यामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आल्याचे याचे महत्त्वाचे कारण आहे. व्यापार पंडितांच्या मते, दोन चित्रपटांमधील रिलीजदरम्यानचे अंतर खूपच कमी होते, म्हणून ते पुढे ढकलण्यात आले. मोठ्या ताऱ्यांच्या चित्रपटांच्या बाबतीत असे पाऊल उचलणे स्मार्ट मानले जाते. 

 

लवकरच पूर्ण होईल 'तानाजी'चे शूटिंग 
खरं तर, अजय दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या चित्रपटाला प्राधान्य देईल, असे जवळच्या सूत्राकडून कळले आहे. अजय फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून 'चाणक्य'ची तयारी करणार आहे. तो यात चाणक्य यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या वेळी नीरज पांडे यांच्या लेखकाच्या टीमसोबत त्याची बैठक होणार आहे. सध्या अजय 'तानाजी'च्या शेवटच्या भागावर काम करत आहे. 'चाणक्य'ची तयारी सुरू करण्याआधी अजय 'तानाजी'चे शूटिंग पूर्ण करू इच्छित आहे. खरं तर, एकापाठोपाठ एक ऐतिहासिक चित्रपट करायचे अजयने ठरवले आहे. कारण दुसरे चित्रपट हातात घेतले तर इतर पात्राची तयारी करायला बराच वेळ लागतो. 

 

 

  1. मार्चमध्ये बोनी सुरू करणार शूट 
    अजय फुटबॉलपटू सय्यद अब्दुल रहीम यांच्या बायोपिकदेखील काम करणार आहे. याची निर्मिती बोनी कपूरच्या करणार आहेत. दिग्दर्शक अमित रविचरण शर्मा आहेत. मार्च-एप्रिलमध्ये शूटिंग सुरू करणार असल्याचे बोनी यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. याबरोबरच नीरज पांडे यांचा 'चाणक्य' याच दरम्यान सुरू होणार आहे, त्यामुळे अजय कोणत्या चित्रपटाला प्राधान्य ते पाहण्याजोगे राहील. 
     

बातम्या आणखी आहेत...