आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रत्येक मराठा वेडा आहे, स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा.....' , 'तान्हाजी' यांचा इतिहास रेखाटणारा मराठी ट्रेलर रिलीज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  तान्हाजी मालूसरे यांनी सिंहगडावर गाजवलेला पराक्रम ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट हिंदीसोबतच आता मराठीतही प्रदर्शित होतोय. मागील महिन्यात चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर हा चित्रपट मराठीतदेखील प्रदर्शित व्हावा अशी मागणी होऊ लागली होती. अभिनेता अजय देवगणने सिनेरसिकांच्या आग्रहाखातर चित्रपट मराठीत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मराठी चित्रपटाचा 15 सेकंदाचा टीजर प्रदर्शित केल्यानंतर आज अजय देवगणने चित्रपटाचा 3 मिनिटे 18 सेकंदांचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. अजय देवगणने त्याच्या इन्स्टाग्रामवर ट्रेलरची लिंक शेअर करुन ''छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंह शूरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या आयुष्यावर आधारित एक झंझावात ट्रेलर आलाय तुमच्या भेटीला.'', असे कॅप्शन दिले आहे. 

मराठीत चित्रपट प्रदर्शित करण्याविषयी अजय देवगणने अलीकडेच म्हणाला होता, “एका शूर मराठा योद्ध्याची कथा हिंदी भाषेसह त्याच्या मातृभाषेत प्रेक्षकांसोबत शेअर करता येणार आहे, हे मी माझे भाग्यच समजतो. ज्या पद्धतीने संपूर्ण देशासमोर इतिहासाची पाने उलगडणार आहेत, त्याच दिमाखदार प्रवासाची अनुभूती समस्त महाराष्ट्राने घ्यावी असे मला वाटते.”

‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजींची भूमिका साकारत असून अभिनेत्री काजोल तान्हाजी मालुसरे यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. अभिनेता सैफ अली खान राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मराठमोळा अभिनेता शरद केळकर शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे तर राजमाता जिजाऊंची भूमिका पद्मावती राव वटवणार आहेत. मराठी अभिनेता देवदत्त नागेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत चित्रपटात झळकणार आहे. हिंदी आणि मराठी भाषेत एकाच दिवशी म्हणजे येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  

बातम्या आणखी आहेत...