आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- माजी भारतीय बॉलर अजीत अगरकरने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय)च्या मुख्य निवडकर्त्याच्या पदासाठी अर्ज भरला आहे. अगरकरशिवाय इतर 7 जणांनीही या पदासाठी आपला अर्ज दाखल केला आहे. त्याच्याशिवाय नयन मोंगिया, राजेश चौहान, अमेय खुरासिया, ज्ञानेंद्र पांडेय और प्रीतम गांधी, चेतन शर्मा, कमेंटेटर लक्ष्मण शिवारामाकृष्णन सामील आहेत.
बीसीसीआयने माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्या जागेसाठी अर्ज मागवले आहेत. त्या दोघांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. तर निवड समितीमधील इतर तीन सदस्य सरनदीप सिंह, जतिन परांजपे आणि देवांग गांधी कमेटीमध्ये असतील. त्यांचा कार्यकाळ 2020 च्या शेवटच्या महिन्यात संपणार आहे.
अगरकर मुंबई सीनियर सलेक्शन टीमचे प्रमुख होते
42 वर्षीय अगरकर यापूर्वी मुंबई सीनियर सलेक्शन कमेटीचे प्रमुख होते. अगरकरने भारासाठी 26 टेस्ट, 191 वनडे आणि 3 टी-20 मध्ये एकूण 349 विकेट्स घेतल्या आहेत. वन-डेमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेण्यामध्ये त्याचा तिसरे स्थान आहे. त्यांने 288 विकेट्स घेतल्या आहेत. अनिल कुंबळेने 334 आणि जवागल श्रीनाथने 315 विकेट्स घेतल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.