आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असे वृत्त माध्यमांनी दिले आहे. परंतु, भाजप किंवा राष्ट्रवादीकडून अद्याप यासंदर्भात अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि पवार कुटुंबियांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी वारंवार चर्चा केली जात होती. त्यानंतरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे, तर अजित पवार राजकीय संन्यास देखील घेत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या राजीनाम्याचे वृत्त समोर येत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. यात ते देखील राजीनामा देणार असे वृत्त आहे.
भाजपची सत्ता धोक्यात
उल्लेखनीय बाब म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने सकाळीच महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर महत्वाचा निकाल दिला. सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारला 24 तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशात बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा करणाऱ्या भाजपने फ्लोअर टेस्टच्या अवघ्या काही तासांपूर्वी माघार घेतली असे दिसून येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. तत्पूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक वर्षा बंगल्यावर मंगळवारी सकाळी पार पडली. यामध्ये अजित पवार यांनीही उपस्थिती लावली होती. याच बैठकीमध्ये अजित पवारांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपविला.
महाराष्ट्रातील सत्ता नाट्य...
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार आणि त्यांच्या सहकारी आमदारांचा पाठिंबा घेत 23 नोव्हेंबर रोजी सत्ता स्थापित केली. याच दिवशी राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली आणि फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेने आपल्या सर्वच आमदारांशी बोलून पत्रकार परिषद आयोजित केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी आपली फसवणूक झाली असून शरद पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केले. अशात सर्वच आमदारांनी शरद पवारांच्या समर्थनात येऊन अजित पवारांना एकटे पाडले आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. यानंतरही पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेते मंडळींनी अजित पवारांनी भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.