आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो...", विरोधकांनी एकनाथ खडसेंच्या समर्थनार्थ दिल्या घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विधीमंडळाचे अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांकडून घोषणाबाजी सुरुच आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी मांडलेला अतिरिक्त अर्थसंकल्प हा त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आधीच फुटल्याचा आरोप विरोधकांनी केला, तसेच त्याच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली आहे. एकीकडे याबाबत विरोध सुरू असताना, दुसरीकडे विरोधकांनी भाजप नेते एकनाथ खडसे यांनाही समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांनी सरकारला टोमणे लगावले.


एकनाथ खडसे अधिवेशनासाठी सभागृहात येत असताना, विरोधकांनी त्यांच्याकडे पाहून घोषणा सूरू केल्या. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी खडसे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. "नाथाभाऊंना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो...", " निष्ठावंतांना डावलणाऱ्या सरकारचा निषेध असो...", "आयाराम गयारामच्या सरकारचा निषेध असो....", अशाप्रकारच्या घोषणा राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि जयंत पाटील यांनी दिल्या.

 

दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आजही आंदोलन केले. बजेट फोडल्याचा विरोधकांचा आरोप आहे. याप्रकरणी सायबर क्राईमने चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.