आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पवार साहेब हेच नेते : अजित पवार;  भाजपसोबत जाणे नाही : शरद पवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अजित पवार रविवारी दुपारी ट्विटरवर सक्रिय झाले. त्यांनी आपल्या प्रोफाइलवर ‘उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस नेता’ असा उल्लेख केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आदींच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत त्यांचे आभार मानले. तसेच ३५ मिनिटांत धडाधड २४ ट्विट्स केले. अजित पवार : काळजीचे कारण नाही. थोडा धीर धरा. सर्व काही ठीक होईल. मला पाठिंबा दिल्याबद्दल आभार. त्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादीतच असून शरद पवार साहेब हे आपले नेते असून आपले भाजप-राष्ट्रवादीचे सरकार राज्याला स्थिर सरकार देईल. शरद पवार : भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. राष्ट्रवादीने शिवसेना व काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचे एकमताने ठरवले आहे. अजित पवार यांचे विधान खोटे, दिशाभूल करणारे आणि खोडसाळ असून समाजात चुकीचा समज पसरवणारे आहे.बातम्या आणखी आहेत...