Home | Maharashtra | Pune | Ajit Pawar appeals to get Parth Pawar win in election

मुलाच्या विजयासाठी अजित पवारांचे मजेशीर आवाहन, 'पार्थ अविवाहित आहे, त्याला निवडून द्या, तो बॅचलर लोकांचे प्रश्न मांडेल...'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 13, 2019, 06:35 PM IST

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह मावळचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावरही टीका

  • Ajit Pawar appeals to get Parth Pawar win in election

    पुणे- पार्थ पवारच्या प्रचारासाठी वडील अजित पवार यांनी मावळमध्ये तळ ठोकलाय. मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आकुर्डीमध्ये अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना अजित पवारांनी मुलगा पार्थला निवडून देण्याचे आवाहन केले.

    ''पार्थ पवार अविवाहित आहे. त्याला निवडून द्या, बॅचलर लोकही लोकसभेत गेले पाहिजेत, त्यांचेही काही प्रश्न असतील ते पार्थ पवार सोडतील, असे म्हणत त्यांनी पार्थला निवडून देण्याचे आवाहन केले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींसह मावळचे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यावरही टीका केली. ''स्मृती इराणी बारावी पास, हे दहावी पास'', असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.


    महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मावळ मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. 29 एप्रिल रोजी नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या 17 जागांसाठी मतदान होईल.


    मावळमध्ये मुलगा पार्थला जिंकून आणण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुलासाठी ते सध्या पिंपरी चिंचवडमध्ये तळ ठोकून आहेत. मावळमध्ये रायगड जिल्ह्यातीलही तीन विधानसभा मतदारसंघ येतात. उरण, कर्जत आणि पनवेलमध्येही अजित पवार स्थानिक नेत्यांची मदत घेण्याच्या प्रयत्न करत आहेत.

Trending