काही बरळू नका, / काही बरळू नका, हिंमत असेल तर माढ्यातून लढा! अजित पवारांचे चंद्रकांत पाटलांना खुले आव्हान

दिव्य मराठी वेब टीम

Mar 06,2019 12:47:00 PM IST

पुणे- शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामारे जावे लागेल, असे वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचा राष्ट्रवादीचे ज्येष्‍ठ नेते अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अजित पवार हे पिंपरी चिंचवडमधील भोसरीत झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.

चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. हिंमत असेल तर माढ्यातून लढाच, असे खुले अाव्हान अज‍ित पवार यांनी केले आहे. पवार म्हणाले, हा बाबा (चंद्रकांत पाटील) स्वप्नात आहे की बावचळून गेलाय हे माहीत नाही. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् तरी आम्हाला फुकटचे सल्ले देत आहे. पाटलांनी आपली पाटीलकी सांभाळा, असा टोलाही यावेळी पवारांनी लगावला आहे. हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला चितपट केले नाही तर नाव सांगणार नाही, असे खुले आव्हान पवारांनी दिले आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र, त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामारे जावे लागेल. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा विचार करता निवडणूक लढवू नये. माढा आणि बारामत या जागी युतीचेच उमेदवार जिंकतील, असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात केले होते.

X
COMMENT