आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीतच राहून स्थिर सरकार देणार! अजित पवारांच्या ट्विटवर शरद पवारांनी दिली ही प्रतिक्रिया...

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महाराष्ट्रात शनिवारच्या शपथविधी आणि सत्ता स्थापनेनंतर राजकीय हालचालींना रविवारी आणखी वेग आला. यात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मौन धारण करणारे अजित पवार यांनी ट्विटरवर एकानंतर एक ट्विट केले. त्यामध्येच बोलताना, मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आणि पवार साहेब हेच आमचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सरकार मिळून राज्यात स्थिर सरकार देणार असे अजित पवार यांनी सांगितले. त्यावर वेळीच ट्विट करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट केले.

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवारांच्या ट्विटला उत्तर देताना शरद पवार यांनी लिहिले, भाजपसोबत आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही. अजित पवार यांची प्रतिक्रिया मुळीच चुकीची आहे. त्यामुळे, गैरसमज निर्माण होत आहेत. लोकांमध्ये चुकीचा संदेश पसरवला जात आहे.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे आमदारांचे तात्पुरते निवास झालेल्या रिनेसॉ हॉटेलमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राउत यांनी आमदारांना संबोधित केले.  

बातम्या आणखी आहेत...