अजितदादांचा ‘विक्रम’ / चाैथ्यांदा उपमुख्यमंत्रिपद, एकाच महिन्यात दाेनदा शपथविधीचा ‘साेहळा’

  • सर्वाधिक वेळा हे पद भूषवण्याचा व महिनाभरात दुसऱ्यांदा या पदाची शपथ घेण्याचा अनाेखा ‘विक्रम’

दिव्य मराठी

Dec 31,2019 06:56:00 AM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी चाैथ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात सर्वाधिक वेळा हे पद भूषवण्याचा व महिनाभरात दुसऱ्यांदा या पदाची शपथ घेण्याचा अनाेखा ‘विक्रम’ त्यांच्या नावावर नाेंद झाला.

> नाेव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१२, डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४, २३ नाेव्हेंबर ते २६ नाेव्हेंबर २०१९ आणि आता ३० डिसेंबरपासून अशा चार वेळा त्यांनी हे पद भूषवले.

> २३ नाेव्हेंबर २०१९ राेजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची गुपचूप शपथ घेतली हाेती, मात्र चारच दिवसांत त्यांना राजीनामे द्यावे लागले हाेते.

X
COMMENT