आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थसाठी अजितदादा मैदानात; शिवसेनेच्या हॅट‌्ट्रिकसाठी बारणेंची शर्थ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे । मावळ लाेकसभा मतदारसंघात पुणे व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी ३ विधानसभा मतदारसंघांचा समावेश हाेताे. यापैकी २ आमदार शिवसेनेचे, ३ भाजपचे तर एक राष्ट्रवादीचा अाहे. १० वर्षांपासून येथे शिवसेनेचे वर्चस्व आहे. पुनर्रचनेनंतर मावळ मतदारसंघात २००९ मध्ये गजानन बाबर तर २०१४ मध्ये श्रीरंग बारणे यांनी येथील प्रतिनिधित्व केले. यंदाही बारणे यांना शिवसेनेची उमेदवारी मिळणार हे निश्चित. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी या वेळी मावळ मतदारसंघाची लढत प्रतिष्ठेची करत आपले पुत्र पार्थ यास निवडणुकीत उतरवले आहे. उमेदवार पार्थ असला तरी ही लढत अजित पवार विराेधात शिवसेना अशीच हाेईल, यात शंका नाही.  


राज्यात युती सरकार सत्तारूढ हाेईपर्यंत पिंपरी-चिंचवड परिसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हाेता. मात्र भाजपने त्याला सुरुंग लावत पुणे व पिंपरीची महापालिका ताब्यात घेतली. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते व २०१४ मध्ये भाजपत आलेले लक्ष्मण जगताप चिंचवडचे आमदार आहेत. मावळ विधानसभा मतदारसंघात २५ वर्षांपासून भाजपचाच आमदार निवडून येत आहे. सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय भेगडे येथील प्रतिनिधित्व करतात. पनवेलमध्ये २००९ पासून भाजपचे प्रशांत ठाकूर आमदार आहेत. २ टर्मपासून कर्जत राष्ट्रवादीकडे आहे. उरणमध्ये शिवसेनेचे मनाेहर भाेईर आमदार आहेत. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांना मानणारा माेठा वर्ग आहे. त्यातही घाटाखालच्या रायगड जिल्ह्यात शेकापला मानणारा माेठा वर्ग आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी शेकापकडून लाेकसभा लढवली हाेती. त्यांना साडेतीन लाखांवर मते पडली हाेती. शेकापची ही ताकद पार्थच्या पाठीशी उभी राहिल्यास हा मतदारसंघ ताब्यात आणणे शक्य आहे.

 

काय सांगतो मावळचा कल?

2009

गजानन बाबर (शिवसेना) 3,64,857  
आझम पानसरे (राष्ट्रवादी) 2,84,238  

2014

श्रीरंग बारणे (शिवसेना) 5,12,226  
लक्ष्मण जगताप (शेकाप) 3,54,829
 

बातम्या आणखी आहेत...