आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार नाहीत, जयंत पाटील अधिकृत गटनेते- राष्ट्रवादी  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हीप काढण्याचा आधिकार जयंत पाटलांकडे

मुंबई- राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार नसून, जयंत पाटील यांचीच अधिकृत नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. विधिमंडळाच्या रेकॉर्डवर अजित पवारांचे नाव नाही. त्यामुळे जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते असून त्यांना व्हीप काढण्याचे अधिकार असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष किंवा सरचिटणीस करतो. राज्यपाल आणि विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती द्यावी लागते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभा अध्यक्षांना माहिती नसते. राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवली नव्हती. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही.राष्ट्रवादीने विधिमंडळ गटनेतेपदी जयंत पाटलांची निवड केली आहे. त्यामुळे जयंत पाटील किंवा त्यांनी प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच व्हीप अधिकृत असेल, असे सांगण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांना व्हीप काढण्याचा कोणाताही अधिकार नाही. ज्यांना पद जाईल असा धोका वाटत आहे. त्यांनी काळजी करु नये. त्यांची जबाबदारी मी स्वतः घेतो, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पक्षाच्या आमदारांना दिली होती.
 

बातम्या आणखी आहेत...