आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पार्थ लवकरच राजकारणाच्‍या फडात? अजित पवारांनी दिले संकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्‍याचे माजी उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्‍याचे संकेत स्‍वत: अजित पवार यांनी दिले आहेत. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनूसार, मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ याचे नाव समोर येत आहे.

 

आज (मंगळवारी) एका न्‍यूज चॅनेलला दिलेल्‍या मुलाखतीत अजित पवार यांनी सांगितले आहे की, 'पक्षात लोकशाही आहे. यामुळे लोक काय म्‍हणतात हे आधी पाहू.'
राष्ट्रवादी काँग्रेसची 6 आणि 7 ऑक्टोबरला लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्षांचे म्हणणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ऐकून घेणार आहेत. त्यानंतर निर्णय होईल, अस अजित पवार यांनी सांगितले आहे. यामुळे पवार कुटुंबाची तिसरी पिढी लवकरच सक्रीय राजकारणात दिसण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

 

ज्‍या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी पार्थ पवार यांचे नाव समोर येत आहे, तो सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. श्रीरंग बारणे हे मावळचे खासदार आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदार संघ आहेत.


पार्थ 2014 पासून काही वेळा पक्षाचा प्रचार करताना दिसला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपले मामा पद्मसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी त्‍याने रोड शोदेखील केला होता. यानंतर बारामतीत मराठा क्रांती मोर्चात तो सहभागी झाला होता.


पार्थ हा आपले वडिल अजित पवारांसारखाच दिसतो. त्याचं बोलणं- चालणं अगदीच अजित पवारांसारखे असल्याने तरूणांत त्याची क्रेझ आहे. तसेच बारामतीतील विविध कार्यक्रमांनाही तो  आर्वजून हजेरी लावताना दिसत आहे.

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...