आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्थ यांच्या विजयासाठी अजित पवार मैदानात !

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पनवेल - मावळमधून राष्ट्रवादीकडून पार्थ पवार लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले. आता पुत्रच मैदानात असल्याने अजित पवार यांनीही त्याला विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाने मावळ मतदारसंघाची आढावा बैठक आयोजित केली होती. या वेळी पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.  


पवार म्हणाले,  मोदी सरकारने नोटबंदी करून जनतेला त्रास दिला. अनेकांचे बळी गेले. गव्हर्नर रघुराम राजन, ऊर्जित पटेल हे भाजपच्या एकाधिकारशाहीला कंटाळून निघून गेले. भाजप व शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे.


पार्थ यांना १ लाख मतांची आघाडी देऊ : पाटील 
शिक्षक मतदारसंघातून शेकापचे नेते बाळाराम पाटील यांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी शर्थ केली होती. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांना विजयी करण्याची ग्वाही शेकापच्या नेत्यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...