आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन दिवसांपूर्वीच ठरला हाेता दादांच्या राजीनाम्याचा निर्णय? विधानसभा अध्यक्षांना फाेनवर विचारले हाेते ‘तुम्ही मुंबईत कधी येणार?’

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शरद पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असताना शुक्रवारी अजित पवारांनी तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली. शरद पवार यांनाही या निर्णयाची कल्पना नव्हती. असे असले तरी, ३ दिवसांपूर्वी अजितदादांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना फाेन करून ‘तुम्ही मुंबईत कधी येणार?’ अशी विचारणा केली हाेती.  ‘तूर्त नाही’ असे बागडेंनी उत्तर दिल्यामुळे दादांनी फाेन करण्याचे कारण सांगितले नव्हते. मात्र, त्याच वेळी राजीनाम्याचा निर्णय पक्का झाला हाेता,’ अशी माहिती समाेर आली आहे. एक-दोन दिवसांत स्वतः अजितदादा  राजीनाम्याचे कारण स्पष्ट करणार आहेत. अजितदादांच्या राजीनाम्याची बातमी कळताच पत्रकारांनी  बागडे यांना फाेन करून खातरजमा केली. त्या वेळी बागडे म्हणाले, ‘सायंकाळी दादांचे पीए माझ्या  मुंबईतील कार्यालयात गेले. ‘पीएस’ची भेट घेतली. त्यांनी बागडेंना फाेन लावून दिला. त्यावर पीएंनी ‘अजितदादा राजीनामा देऊ इच्छित आहेत,’ असे सांगून बागडेंचे थेट दादांशी फाेनवर बाेलणे करबन दिले. दादांनी राजीनाम्याचा निर्णय सांगितला. त्यावर मी चकित झालाे. एवढा तडकाफडकी निर्णय का? असे विचारले असता ‘नंतर बाेलू’ एवढेच उत्तर त्यांनी. ‘निवडणूक लढवणार नाही का?’ असा प्रश्नही त्यांना केला असता ‘नंतरच बाेलू’ असे दादांनी सांगितले. खरे तर ३ दिवसांपूर्वीही दादांनी मला फाेन करून मुंबईत कधी येणार आहात?’ असे विचारले हाेते, मात्र तूर्त मी येणार नसल्याचे त्यांना सांगितले हाेते,’ असेही बागडेंनी नमूद केले. यातून दादांना तीन दिवसांंपूर्वीच राजीनाम्याचा निर्णय कळवायचा हाेता, असा अर्थ राजकीय वर्तुळातून काढला जात आहे. शरद पवारांसाठी पक्ष रस्त्यावर,  अजित पवारांची पाठराखण नाही सहकारी बँक घाेटाळ्यात ईडीने शरद पवारांसह अजितदादांवरही गुन्हे दाखल केले. मात्र, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शुक्रवारच्या आंदाेलनात फक्त शरद पवारांवर सूडबुद्धीने कारवाई केल्याबद्दल संताप व्यक्त करत हाेते. अजित पवारांचा पाठराखण करताना काेणीही नेते, कार्यकर्ते दिसले नाहीत. त्यामुळे सिंचन घाेटाळ्याप्रमाणे आता या घाेटाळ्यातही आपण अडकत असताना पक्ष पाठीशी नसल्याने नाराज दादांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

यापूर्वीही राजीनामा : वादग्रस्त वक्तव्यानंतर केला हाेता आत्मक्लेश
सिंचन घाेटाळा, पाणीटंचाईबाबत वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार अडचणीत आले हाेते. त्या वेळी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. प्रीतिसंगमावर एक दिवस आत्मक्लेश केला हाेता. मात्र काही दिवसांनंतर लगेचच ते पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी झाले.


भाजपचा टाेला
घरगुती वादाचेही कारण असेल : गिरीश मह
ाजन
भाजपचे नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘अजित पवार यांनी राजीनामा का दिला ते ठाऊक नाही. कदाचित त्यांचे घरगुती वाद असू शकतील. मात्र, अजित पवार यांचा पक्षांतराचा किंवा भारतीय जनता पक्षात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.’


पार्थ पवार म्हणतात...
अजितदादा कदापि राजकारण साेडणार ना
हीत
अजितदादांचा मुलगा पार्थ यांनी सांगितले, ‘आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक अन‌् अवघड हाेता. कारण मी माझ्या वडिलांसाेबत झालेलं भाषण कुटुंबप्रमुख म्हणून पवार साहेबांना कळवलं आहे. मात्र अजितदादांचा राजकारण साेडण्याचा अजिबात विचार नव्हता आणि नाही.’

बातम्या आणखी आहेत...