आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांवर नाराजीचे आणखी एक कारण, म्हणून अजितदादांचा राजीनामा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनायक एकबोटे 

नांदेड - अजित पवार यांच्या ‘ना’राजीनामा नाट्यामागे पवार कुटुंबात कलह व पक्षांतर्गत वर्चस्वाचा वाद असल्याचे सांगितले जात असले तरी आणखी एका महत्त्वपूर्ण कारणाचीही राष्ट्रवादीच्या गाेटात चर्चा सुरू आहे. ते म्हणजे, एकाच सरकारमध्ये असतानाही सिंचन घाेटाळा व राज्य सहकारी बँकेतील घाेटाळ्याची प्रकरणे बाहेर काढून अजित पवारांना अडचणीत आणणारे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खुद्द शरद पवारांकडून हाेत असलेली पाठराखण. 

अशाेक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसने केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवले ते ‘राष्ट्रवादी’ला अडचणीत आणण्यासाठीच, अशी चर्चा तेव्हा हाेती. सिंचनाच्या कामात ७० हजार काेटींच्या अनियमिततेचे प्रकरण पृथ्वीराज चव्हाण यांनीच चव्हाट्यावर आणले. अजित पवार व सुनील तटकरे यांनी जलसंपदामंत्री असताना घेतलेल्या कामांची चाैकशी सुरू झाली. २०१४ च्या निवडणुकीत विराेधकांनी याच मुद्द्यावर रान पेटवले व आघाडीला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराच्या चाैकशीचे आदेशही चव्हाणांनीच दिले. अजित पवारांसह शरद पवारांवरही गुन्हा दाखल झाला. त्यावेळी काँग्रेसने ‘सहकार्या’ची भूमिका घेतली असती दाेन्ही प्रकरणातून अजित पवारांचा ‘बचाव’ करू शकले असते, अशी राष्ट्रवादीत भावना आहे. मात्र चव्हाणांनी जाणीवपूर्वक राष्ट्रवादीची प्रतिमा खराब केल्याचा आराेप हाेताेय. सातारा लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवण्याची तयारी करत आहे. त्यासाठी स्वत: शरद पवार यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करत प्रचाराची जबाबदारीही घेतली. अजित पवारांना काकांचा हा निर्णय खटकला आणि त्यांनी थेट राजीनाम्याचे पाऊल उचलले, अशी राष्ट्रवादीच्या गाेटात चर्चा आहे.
 

चव्हाण लाेकसभेसाठी अनुत्सुक
साताऱ्यातील दक्षिण कराड, उत्तर कराड, माण या जागा काँग्रेस तर वाई, जावळी राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे आघाडीची बाजू मजबूत मानली जाते. त्यात उदयनराजेंना धडा शिकवण्यासाठी शरद पवार यांनीही आघाडीच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. असे असले तरी उदयनराजेंचा स्वत:चा दबदबा आहे. त्यामुळे त्यांचा पराभव करणे वाटते तेवढे साेपे नाही, याची चव्हाणांनाही जाण आहे. त्यामुळे ते या निवडणुकीसाठी फारसे इच्छुक नाहीत.

बातम्या आणखी आहेत...