आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मावळमधील पार्थच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे'- अजित पवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मावळमध्ये मुलगा पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. "मावळमध्ये पार्थचा झालेला पराभव मी स्वीकारलेला आहे. त्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी अजित पवारची आहे", असे अजित पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी 2 लाख 15 हजार 913 मतांनी पराभव केला.


काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक
लोकसभा निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची आज बैठक पार पडली. बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्यात आली आहे. बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, यांच्यासह मित्र पक्षातील हितेंद्र ठाकूर, जोगेंद्र कवाडे, अबू आझमी उपस्थित होते.

 

 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निकालाबाबत भाष्य केले होते. "पार्थची जागा आम्ही कधीच जिंकलो नव्हतो, जिंकून येणारी ती जागा नव्हती, पण आम्ही प्रयत्न केला", अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
 

बातम्या आणखी आहेत...