आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्षाच्या नावावर एवढेे कमावले, आता 5-10 टक्के तरी द्या; अजित पवारांच्‍या पदाधिका-यांना कानपिचक्‍या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औैंरगाबाद - 'एखादा मेळावा घ्यायचे म्हणले की, काही पदाधिकारी मोबाईल बंद करुन ठेवतात. मेळावा संपला की मोबाईल सुरु होतो. पक्षाच्या नावावर एवढे कमावले, 5-10 टक्के तरी पक्षाला द्या', अशा शब्‍दांत अजित पवार यांनी बुधवारी पक्ष पदाधिकाऱ्यांना  सुनावले. औरंगाबादेत बुधवारी युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचा मेळावा पार पडला. मेळाव्‍यात अजित पवारांनी दीड तास भाषण केले. भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार तसेच भाजपावर टिका केलीच. त्याचवेळी पक्षांच्या नेत्यांना देखील कानपिचक्या दिल्या. या मेळाव्यात अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला जात होता. तेव्हा एका जिल्ह्यातून एक आमदार निवडून देणार, मग कसा मुख्यमंत्री होईल, अशी टिकाही त्यांनी केली.

 

पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि गावात सरपंच कोणत्या पक्षाचा
या मेळाव्यात पवारांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री केल्यानंतर पवारांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. 'मुख्यमंत्र्यासाठी १४५ ची फिगर लागते. नुसत्‍या घोषणा करुन चालत नाही. तुम्‍ही पक्षाचे जिल्‍हाध्‍यक्ष असाल आणि गावात सरपंच निवडून आणता येत नसेल तर कसे होईल. पक्षाचे शहराध्यक्ष आहात आणि आपल्या वार्डात नगरसेवक निवडून आणता येत नाही. ज्याला स्वत:च्या घरात निवडून आणता येत नाही, मग इतरांना कसे आणणार?' असा सवाल त्यांनी केला. १९६७ पासून बारामतीमध्ये शरद पवार, अजित पवार निवडून येत आहेत. इतक्या पिढ्या बदलल्या तरी पक्ष निवडून येतो. सर्वच ठिकाणी अशी स्थिती आली पाहिजे. त्यासाठी तसे कामही करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

 

तर कितीही मोठ्या  बापाचा असू द्या कारवाई होईल
युवकांना उद्देशून अजित पवार म्‍हणाले,  'तुम्ही लढा, काही चुका झाल्यास घाबरु नका. मात्र जाणीवपुर्वक कुठलीही चुक करु नका' मात्र पक्षाचे नाव बदनाम  होईल असे माहित असतांनाही मुद्दाम चुक केली तर कितीही मोठ्या बापाचा असू द्या त्यावर कारवाई होईल,  असा इशाराही त्यांनी दिला.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...